shape
shape

Author: sanvedan

सामूहिक मन: आंदोलनाच्या गतिशीलतेचा एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

आंदोलनाच्या गतिशीलतेचा एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन, ज्यावेळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतो आणि निदर्शने किंवा आंदोलने करतो, त्यावेळी...

Read More

मला मानसशास्त्राची काय गरज? त्रास तरसमोरच्यालाच आहे! जाणून घ्या रोजच्या आयुष्यात मानसशास्त्र समजून घेण्याचे महत्त्व

मला मानसशास्त्राची काय गरज? “माझं सगळं व्यवस्थित आहे. अडचण तर समोरच्या व्यक्तीमध्ये आहे!” हे वाक्य आपण कधी स्वतःला म्हटलंआहे का? कदाचित मोठ्याने नाही; पण मनातल्या मनात नक्कीच. घरातील वाद असो, जोडीदाराशी होणारेगैरसमज असोत, मुलांचं हट्टी वागणं असो किंवा ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीशी सतत होणारा संघर्ष आपण अनेकदा समस्येचं कारण बाहेर शोधतो. “तो बदलला की सगळं ठीक होईल”, “ती मला समजून घेतनाही”, “माझं मूल ऐकतच नाही”, “माझा बॉसच विचित्र आहे”… पण एकदा थांबून स्वतःला विचारूया या सगळ्या परिस्थितींमध्ये माझे विचार, माझ्या भावना, माझ्या अपेक्षाआणि माझ्या प्रतिक्रिया यांची भूमिका काय आहे? आणि इथेच मानसशास्त्र आपल्या आयुष्यात प्रवेश करतं. मानसशास्त्र म्हणजे फक्त मानसिक आजार, मानसोपचार किंवा समुपदेशन यांच्यापुरतं मर्यादित असलेलंशास्त्र नाही. आपण कसे विचार करतो, भावना कशा अनुभवतो, निर्णय कसे घेतो, सवयी कशा तयार होतात, नातेसंबंधात गैरसमज का होतात, ताण आणि चिंता कशी वाढते, सोशल मीडिया आपले लक्ष कसे खेचतोआणि आपण स्वतःलाच कसे समजून घेतो—या सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणजे काय?  सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मानसशास्त्र म्हणजे मानवी मन आणि वर्तन समजून घेण्याचं शास्त्र. आपल्याविचारांचा आपल्या भावनांवर परिणाम होतो; भावनांचा आपल्या वर्तनावर; आणि आपल्या वर्तनाचा पुन्हानातेसंबंधांवर, कामावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हा एक सतत चालणारा चक्राकार प्रवासआहे. म्हणूनच मानसशास्त्र शिकण्याचा अर्थ “माझ्यात काहीतरी बिघडलंय” असा अजिबात नाही. उलट, स्वतःलाआणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. १. ओव्हरथिंकिंग कसे थांबवावे: विचार करणे आणि विचारांच्या चक्रात अडकणे यातील फरक “काल मी असं का बोललो?”, “त्याने माझ्या मेसेजला उत्तर का दिलं नाही?”, “उद्या काय होईल?”, “मीचुकीचा निर्णय घेतला तर?” असे प्रश्न मनात पुन्हा पुन्हा फिरत राहतात. विचार करणे ही नैसर्गिक प्रक्रियाआहे; पण जेव्हा विचार आपल्याला उपायाकडे न नेतात त्याच जागी फिरवत राहतात, तेव्हा त्याचे रूपांतर’ओव्हरथिंकिंग’मध्ये होते. ओव्हरथिंकिंग कसे थांबवावे, हा प्रश्न पडल्यावर मानसशास्त्र आपल्याला विचार थांबवायला शिकवत नाही; तर ते विचारांकडे कशा दृष्टीने पाहायचं हे शिकवतं. विचार म्हणजे अंतिम तथ्य नाहीत, ही जाणीव निर्माणझाली की आपण प्रत्येक विचारावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्याची पडताळणी करू शकतो....

Read More

नकार देण्यापेक्षा पार्टनरला संपवण्या मागचे मानसशास्त्र | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

मानवी वर्तन आणि मानसशास्त्र – जेव्हा समाजात एखादी धक्कादायक किंवा दुर्दैवी घटना घडते, तेव्हा लोकांची पहिली प्रतिक्रिया बहुदा एकच असते:...

Read More

बालमानसशास्त्र (Child Psychology): डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात मुलांचे मानसिक आरोग्य कसे जपावे?

बालमानसशास्त्र (Child Psychology) – आजचे युग हे संपूर्णपणे डिजिटल युग आहे. या युगात जन्माला आलेली मुले ही ‘डिजिटल नेटिव्ह्ज’ आहेत....

Read More
भगवद्गीतेतील-मानसशास्त्र

भगवद्गीतेतील मानसशास्त्र: दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थापनासाठी ४ सोपे आणि व्यावहारिक उपाय

भगवद्गीतेतील मानसशास्त्र – २१ व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे वेगवान आणि तितकेच आव्हानात्मक झाले आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रातील डेडलाईन्स असोत,...

Read More

Humor – Missing Pillar of Mindfulness

एक कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट म्हणून माझा बराचसा वेळ लोकांशी ‘माइंडफुलनेस’ (सजकता) या विषयावर बोलण्यात जातो. पण जेव्हा जेव्हा मी हा विषय...

Read More

‘नाही’ म्हणणारी मुले: बंडखोर की विचारी?

मुलांच्या ‘नाही’ मागचं मानसशास्त्र: एक पालक म्हणून काय करावे? मुलांचे ‘नाही’ म्हणणेः एक डोकेदुखी की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास? “नाही!” (No!)...

Read More

मुलांचे वर्तन बदलण्यासाठी मारापेक्षा ‘सकारात्मक प्रोत्साहन’ का गरजेचे आहे? | Child psychology

प्रत्येक पालकाचे एकच स्वप्न असते आपल्या मुलाने समाजात नाव कमवावे, चांगल्या सवयी आत्मसात कराव्या, वेळेवर अभ्यास करावा आणि मोठ्यांचा आदर...

Read More

प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलात का? ‘नाही’ म्हणायला शिका

आपल्या समाजात इतरांना मदत करणे, त्यांना आनंदी ठेवणे हा एक चांगला गुण मानला जातो. पण जेव्हा ही सवय एका मर्यादेपलीकडे...

Read More

टॉक्सिक’ ऑफिस आणि तुमचं मानसिक आरोग्य

आजच्या वेगवान कॉर्पोरेट जगात ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ (Work-life balance) हा शब्द फक्त ऐकण्यापुरताच उरला आहे. सकाळी ऑफिसला निघाल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत...

Read More