मला मानसशास्त्राची काय गरज? “माझं सगळं व्यवस्थित आहे. अडचण तर समोरच्या व्यक्तीमध्ये आहे!” हे वाक्य आपण कधी स्वतःला म्हटलंआहे का? कदाचित मोठ्याने नाही; पण मनातल्या मनात नक्कीच. घरातील वाद असो, जोडीदाराशी होणारेगैरसमज असोत, मुलांचं हट्टी वागणं असो किंवा ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीशी सतत होणारा संघर्ष आपण अनेकदा समस्येचं कारण बाहेर शोधतो. “तो बदलला की सगळं ठीक होईल”, “ती मला समजून घेतनाही”, “माझं मूल ऐकतच नाही”, “माझा बॉसच विचित्र आहे”…
पण एकदा थांबून स्वतःला विचारूया या सगळ्या परिस्थितींमध्ये माझे विचार, माझ्या भावना, माझ्या अपेक्षाआणि माझ्या प्रतिक्रिया यांची भूमिका काय आहे? आणि इथेच मानसशास्त्र आपल्या आयुष्यात प्रवेश करतं.
मानसशास्त्र म्हणजे फक्त मानसिक आजार, मानसोपचार किंवा समुपदेशन यांच्यापुरतं मर्यादित असलेलंशास्त्र नाही. आपण कसे विचार करतो, भावना कशा अनुभवतो, निर्णय कसे घेतो, सवयी कशा तयार होतात, नातेसंबंधात गैरसमज का होतात, ताण आणि चिंता कशी वाढते, सोशल मीडिया आपले लक्ष कसे खेचतोआणि आपण स्वतःलाच कसे समजून घेतो—या सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र.
मानसशास्त्र म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मानसशास्त्र म्हणजे मानवी मन आणि वर्तन समजून घेण्याचं शास्त्र. आपल्याविचारांचा आपल्या भावनांवर परिणाम होतो; भावनांचा आपल्या वर्तनावर; आणि आपल्या वर्तनाचा पुन्हानातेसंबंधांवर, कामावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हा एक सतत चालणारा चक्राकार प्रवासआहे.

म्हणूनच मानसशास्त्र शिकण्याचा अर्थ “माझ्यात काहीतरी बिघडलंय” असा अजिबात नाही. उलट, स्वतःलाआणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
१. ओव्हरथिंकिंग कसे थांबवावे: विचार करणे आणि विचारांच्या चक्रात अडकणे यातील फरक
“काल मी असं का बोललो?”, “त्याने माझ्या मेसेजला उत्तर का दिलं नाही?”, “उद्या काय होईल?”, “मीचुकीचा निर्णय घेतला तर?” असे प्रश्न मनात पुन्हा पुन्हा फिरत राहतात. विचार करणे ही नैसर्गिक प्रक्रियाआहे; पण जेव्हा विचार आपल्याला उपायाकडे न नेतात त्याच जागी फिरवत राहतात, तेव्हा त्याचे रूपांतर’ओव्हरथिंकिंग’मध्ये होते.
ओव्हरथिंकिंग कसे थांबवावे, हा प्रश्न पडल्यावर मानसशास्त्र आपल्याला विचार थांबवायला शिकवत नाही; तर ते विचारांकडे कशा दृष्टीने पाहायचं हे शिकवतं. विचार म्हणजे अंतिम तथ्य नाहीत, ही जाणीव निर्माणझाली की आपण प्रत्येक विचारावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्याची पडताळणी करू शकतो. “मला असंवाटतंय” आणि “हे नक्कीच खरं आहे” यामध्ये मोठा फरक आहे.
याच ठिकाणी कॉग्नेटिव बिहेवरल थेरेपी (सी.बी.टी) सारख्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार-भावना-वर्तनयांचा परस्पर संबंध समजून घेणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
२. राग नियंत्रण कसे करावे: “मला राग येतो” की “मी रागाने प्रतिक्रिया देतो”?
राग ही एक नैसर्गिक भावना आहे. पण राग आल्यावर आपण काय करतो, हा आपल्या वर्तनाचा भाग आहे. एखाद्याने आपल्याला दुखावलं, दुर्लक्ष केलं किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे वागलं नाही, तर राग येणं स्वाभाविकअसू शकतं. पण त्या रागाच्या भरात आपण ओरडतो, अपमान करतो, शांतपणे संवाद साधतो की काही काळस्वतःला वेळ देतो ही निवड आपल्या भावनिक कौशल्याशी संबंधित आहे.
राग नियंत्रण म्हणजे भावना दाबून ठेवणे नव्हे. भावना ओळखणे, तिच्यामागची मूळ गरज किंवा अपेक्षा समजूनघेणे आणि त्यानंतर योग्य प्रतिक्रिया निवडणे—हीच खऱ्या भावनिक बुद्धिमत्तेची सुरुवात आहे.
३. नातेसंबंध आणि संवाद: समस्या नेहमी “समोरच्या व्यक्तीत” असते का?
नात्यांमध्ये अनेकदा घटना लहान असते, पण आपण तिचा लावलेला अर्थ मोठा असतो. “तू फोन केला नाहीस” ही केवळ एक घटना आहे. “तुला माझी काळजीच नाही” हा आपण काढलेला त्याचा अर्थ आहे. आणि त्याअर्थावरून निर्माण होणारी भावना—दुःख, राग किंवा असुरक्षितता—आपल्या पुढच्या वर्तनाला आकार देते.
मानसशास्त्र आपल्याला या प्रक्रियेकडे पाहायला शिकवतं: घटना काय घडली? मी त्याचा अर्थ काय लावला? मला काय वाटलं? आणि मी त्यावर कशी प्रतिक्रिया दिली?
नातेसंबंध आणि संवाद यामधील हा छोटासा बदल अनेक नात्यांमध्ये मोठा सकारात्मक फरक निर्माण करूशकतो. कारण संवाद म्हणजे फक्त आपण काय बोलतो एवढंच नाही; तर समोरच्याने त्याचा नेमका काय अर्थघेतला, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
४. मानसिक ताणतणाव उपाय: ताण आणि चिंता यातील फरक
दैनंदिन संभाषणात “मला खूप स्ट्रेस आहे” आणि “मला खूप अँझायटी आहे” हे शब्द आपण सहज वापरतो. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ताण आणि चिंता यांच्यात मोठा फरक आहे.
ताण अनेकदा एखाद्या बाह्य मागणीला किंवा आव्हानाला शरीर-मन देत असलेली तात्पुरती प्रतिक्रिया असूशकते—जसे की कामाची अंतिम मुदत, आर्थिक जबाबदारी किंवा कौटुंबिक प्रश्न. याउलट, चिंता मात्रभविष्यात काय होईल याबद्दलच्या अनामिक भीतीशी आणि अनिश्चिततेशी जोडलेली असते.
मानसिक ताणतणाव उपाय शोधताना हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक समस्येवर एकचउपाय लागू होत नाही. काही वेळा आपल्याला परिस्थिती बदलण्याची गरज असते; तर काही वेळाअनिश्चिततेशी असलेला आपला दृष्टिकोन बदलण्याची.
५. सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य: मोबाईलचा योग्य वापर
आपण फक्त “पाच मिनिटांसाठी” इंस्टाग्राम उघडतो आणि अर्धा तास कधी निघून जातो ते कळतही नाही. एखादी नोटीफिकेशन आलं की लगेच फोन तपासतो. दुसऱ्यांचं चकचकीत आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्याचीतुलना करतो. कधी प्रेरणा मिळते, तर कधी नकळत अस्वस्थता वाढते.
सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपलंलक्ष, सवयी आणि रिवॉर्ड-सिकिंग बिहेवियर समजून घेण्यासाठी विविध मानशास्त्रीय तंत्रांचा वापर करतात. मात्र, “डोपामाइनमुळे सोशल मीडियाचं व्यसन होतं” असा सरळ निष्कर्ष काढणे अतिसुलभीकरण ठरेल. प्रत्यक्षात सवय, सामाजिक तुलना, भावनिक गरजा आणि डिझाइन—असे अनेक घटक एकत्र काम करतात.
संशोधनात Problematic social media use आणि Depression, Anxiety व Stress symptoms यांच्यातसंबंध आढळले आहेत; मात्र हा संबंध कारण-परिणामाचा सरळ पुरावा आहे असे मानणे योग्य नाही. २०२४मधील एका मोठ्या Systematic review आणि Meta-analysis मध्ये सोशल मीडियाचा वापर, मानसिकआरोग्य आणि झोप यांच्यातील संबंधांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यामुळे प्रश्न “सोशल मीडियाचांगला की वाईट?” एवढाच नसून “मी तो कसा आणि किती वापरतो, आणि त्याचा माझ्या मनावर कायपरिणाम होतो?” हा असायला हवा.
६. आहार आणि मानसिक आरोग्य: शरीराचा मनाशी असलेला संबंध
आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलताना झोप, ताण, नाती आणि विचार यांचाच विचार करतो; पण आहाचाविचार अनेकदा बाजूला राहतो. गेल्या काही वर्षांत Gut-Brain Axis म्हणजे आतड्यांतील प्रणाली आणि मेंदूयांच्यातील द्विमार्गी संवादावर जागतिक स्तरावर संशोधन वाढलं आहे.
याचा अर्थ “एक विशिष्ट पदार्थ खाल्ला की मूड लगेच चांगला होतो” असा नाही. पण आहार, Gut microbiome, Inflammation, Hormones आणि Nervous system यांच्यातील संबंध अधिकाधिकअभ्यासले जात आहेत. काही संशोधनात आहार आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संभाव्य संबंध दिसतात, मात्र या क्षेत्रात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि कोणत्याही एका Diet किंवा Supplement लामानसिक आरोग्याचा हमखास उपाय मानणे योग्य नाही.
म्हणनेच मानसशास्त्र आपल्याला शरीर आणि मन हे वेगळे कप्पे नसून, ती परस्परांशी जोडलेली एक अखंडव्यवस्था (System) म्हणून पाहायला शिकवतं.
७. “मानसिक समस्या” म्हणजे “मानसिक आजार” असतोच असं नाही
दुःख होणे, ताण जाणवणे, एखाद्या नात्यात अडचण येणे, काही काळ झोप न लागणे किंवा एखाद्या प्रसंगामुळेतात्पुरते अस्वस्थ होणे—या सामान्य मानवी अनुभवांना लगेच मानसिक आजाराचे लेबल लावणे पूर्णपणेचुकीचे आहे.
त्याच वेळी, जर एखाद्याच्या अडचणी दीर्घकाळ टिकत असतील, दैनंदिन कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम करतअसतील किंवा व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास होत असेल, तर व्यावसायिक मानसोपचार किंवा समुपदेशनाचीमदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता म्हणजे प्रत्येक गोष्टीला आजार म्हणणेनाही; तर योग्य वेळी योग्य मदत ओळखणे ही आहे.
८. मानसशास्त्र शिकल्यावर आपण इतरांचे मन “वाचू” शकतो का?
कदाचित हा मानसशास्त्राबद्दलचा सर्वात लोकप्रिय गैरसमज आहे. मानसशास्त्र शिकल्यावर कोणाच्या मनातनेमकं काय चाललंय हे १००% ओळखता येत नाही. Body language पाहून एखादी व्यक्ती शंभर टक्के खोटंबोलतेय की खरं, हेही खात्रीने सांगता येत नाही.
पण मानसशास्त्र आपल्याला अधिक चांगले प्रश्न विचारायला शिकवतं. “हा माणूस असा का वागतो?” याढोबळ प्रश्नाऐवजी “त्याच्या या वर्तनामागे कोणते अनुभव, गरजा, भीती किंवा परिस्थिती असू शकते?” असासंवेदनशील विचार करायला शिकवतो. हीच दृष्टी आपल्याला अधिक समजूतदार पालक, जोडीदार, मित्र, शिक्षक आणि व्यवस्थापक बनवू शकते.
मग मानसशास्त्र शिकण्याची खरी गरज कोणाला आहे?
उत्तर अगदी सोपं आहे—ज्याला स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या माणसांना थोडं अधिक चांगल्याप्रकारे समजून घ्यायचं आहे, त्या प्रत्येकाला!
तुम्हाला ओव्हरथिंकिंगमागील विज्ञान समजून घ्यायचं असेल, भावनांशी अधिक सकारात्मकतेने काम करायचंअसेल, नातेसंबंधातील गैरसमज कमी करायचे असतील, मुलांचं वर्तन समजून घ्यायचं असेल, ताण आणिचिंता यांच्यातील फरक ओळखायचा असेल, सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैलीचा मनावर होणारापरिणाम समजून घ्यायचा असेल—तर मानसशास्त्र हे तुमच्यासाठीच आहे.
कारण मानसशास्त्र म्हणजे फक्त “मानसिक आजारांवर उपचार” करण्याचं शास्त्र नाही. ते स्वतःला समजूनघेण्याचं, इतरांना आदर देण्याचं आणि मानवी वर्तनाकडे अधिक शास्त्रीय, संवेदनशील आणि समतोल नजरेनेपाहण्याचं शास्त्र आहे.
मानसशास्त्र समजून घेण्याचा पुढचा टप्पा: ऑनलाइन मानसशास्त्रकोर्स
आज माहिती मिळवणं सोपं आहे. YouTube वर एक Video, Instagram वर एक Reel किंवा Google वरएक Search—आणि आपल्याला मानसशास्त्राबद्दल हजारो माहिती मिळते. पण या माहितीचा वापरस्वतःसाठी कसा करावा हे बऱ्याच जणांना समजत नाही..
मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे फक्त काही तांत्रिक संज्ञा पाठ करणे नव्हे. मानवी वर्तनामागील प्रक्रियासमजून घेणे, विविध मानसशास्त्रीय सिद्धांत आणि संशोधन समजून घेणे, स्वतःच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीनेपाहणे आणि दैनंदिन जीवनात त्या ज्ञानाचा जबाबदारीने उपयोग करणे—हा त्याचा खरा उद्देश आहे.
याच उद्देशाने संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र यांच्या माध्यमातून एका विशेष मानसशास्त्र सर्टिफिकेटकोर्सची रचना करण्यात आली आहे. सोप्या मराठी भाषेत, दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या उदाहरणांसहमानसशास्त्र समजून घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
📋 कोर्सचे सविस्तर तपशील
• कोर्सचे नाव: मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स – A
• आयोजक: संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र
• नोंदणी: स्किल इंडिया नोंदणीकृत संस्था
• मीडिया पार्टनर: महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब
• मार्गदर्शक: श्रीधर कुलकर्णी (M.A. Psychology)
o मानसोपचार व समुपदेशन क्षेत्रातील १४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव.
o CBT, माइंडफुलनेस आणि स्कूल कौन्सिलिंग क्षेत्रातील तज्ज्ञ.
o MSF, Mpower, MDACS यांसारख्या नामांकित संस्थांसोबत कार्याचा अनुभव.
• कालावधी: २९ जुलैपासून पुढे २ महिने
• सत्रे: दर बुधवारी रात्री ७ ते ९ | Live Zoom Sessions
• माध्यम / रेकॉर्डिंग: सोपी मराठी भाषा | ‘संवेदन’ ॲप्लिकेशनवर ३ महिने अमर्यादित वेळा पाहण्याचीसोय
• प्रमाणपत्र व शुल्क: स्किल इंडिया प्रमाणपत्र | शुल्क: ₹६,०००/-
• संपर्क (Contact): 9975769371 / 8767590355



