“मला काही फरक पडत नाही.”
हे वाक्य आपण किती सहज बोलतो.
कोणी आपल्याला दुर्लक्ष केलं, अपेक्षेप्रमाणे वागलं नाही किंवा दुखावलं की आपण पटकन म्हणतो
“जाऊ दे. मला काही फरक पडत नाही.”
पण एक क्षण थांबून स्वतःला विचारलं तर
खरंच काही फरक पडत नाहीये, की फरक पडतोय हे मान्य करायचं नाहीये?
“मला फरक पडत नाही” म्हणण्याचा फायदा काय?
समजा, एखाद्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं.
आपण म्हणतो, “मला काही फरक पडत नाही.”
या वाक्यामुळे त्या क्षणी आपल्याला काय मिळतं?
भावनिक अंतर.
जर मला फरकच पडत नाही, तर मला दुखावलं गेलं हे मान्य करण्याची गरज नाही. माझ्या अपेक्षा होत्या हे स्वीकारण्याची गरजनाही. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा माझ्यावर परिणाम झाला हेही मान्य करावं लागत नाही.
म्हणजेच, या वाक्याचा तात्पुरता emotional payoff असतो
“या व्यक्तीला माझ्यावर परिणाम करण्याची ताकद नाही.”
आणि त्या क्षणी ते मनाला सुरक्षित वाटू शकतं.
मानसशास्त्र याकडे कसं पाहतं?
काही परिस्थितींमध्ये अशा प्रकारचं वर्तन defence mechanism किंवा emotional avoidance शी संबंधित असू शकतं.
मनाला एखादी भावना खूप अस्वस्थ करणारी वाटली, तर ती थेट अनुभवण्याऐवजी तिच्यापासून थोडं दूर राहणं सोपं वाटू शकतं.
उदा. एखाद्याने आपली प्रशंसा केली नाही तर,
“मला कोणाच्या कौतुकाची गरज नाही.”
नात्यात अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर,
“मला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत.”
नकार मिळाला तर,
“मला खरंतर त्यात रसच नव्हता.”
ही वाक्यं प्रत्येक वेळी चुकीची असतीलच असं नाही. पण कधी कधी ती आपल्या भावनेपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा मार्गअसू शकतात.
यामध्ये all-or-nothing thinking सारख्या cognitive patterns चीही छटा दिसू शकते
“जर मला याचा त्रास झाला, तर मी कमजोर आहे.”
पण एखाद्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होणं आणि त्या भावनेच्या आधीन होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
“मला वाईट वाटलं” हे मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही
“मला वाईट वाटलं.”
“मला अपेक्षा होती.”
“मला दुखापत झाली.”
“मला नाकारल्यासारखं वाटलं.”
हे मान्य केल्याने आपण कमजोर होत नाही.
उलट, भावना ओळखता आली की तिच्याबद्दल पुढचा निर्णय घेणं सोपं होतं.
मला बोलायचं आहे का? सीमा आखायची आहे का? अंतर ठेवायचं आहे का? माफ करायचं आहे? की फक्त हे मान्य करून पुढेजायचं आहे?
भावना स्वीकारणं म्हणजे तिच्यावर लगेच कृती करणं नाही.
ते फक्त स्वतःशी प्रामाणिक होणं आहे.
पुढच्या वेळी हे वाक्य मनात आलं तर…
“मला काही फरक पडत नाही” असं म्हणण्याआधी स्वतःला एक छोटा प्रश्न विचारा,
“मला खरंच फरक पडत नाहीये, की फरक पडतोय हे स्वीकारणं मला सध्या सोयीचं आहे?”
उत्तर लगेच मिळेलच असं नाही.
पण प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण कधी कधी आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा आधी स्वतःच्या भावनेला ओळखण्याची गरज असते.
TAKEAWAY
प्रत्येक वेळी “मला काही फरक पडत नाही” म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या पुढे गेलो आहोत, असं नाही.
कधी कधी ते मनाचं संरक्षण असतं.
तात्पुरता payoff मिळतो – दुखापतीपासून थोडं अंतर.
पण भावनिक परिपक्वता कदाचित इथे सुरू होते,
“हो, मला फरक पडला. पण आता त्या भावनेसोबत काय करायचं, हे मी ठरवू शकतो.”
ह्या आणि यासारख्या मानसशास्त्रीय विषयांवरील कोर्सेस साठी learn.sanvedan.com ला भेट दया…



