एकदा एक बंदिवान कैदी काही सैनिक घेऊन जात असतात, नातू आजोबांसोबत त्यांना पाहतो. आजोबा त्याला सांगतात “हा कैदी आहे. ह्याला आता जेल मध्ये हे सैनिक घेऊन जातील.”
नंतर एकदा राजा आपल्या सैनिकांच्या लाव्याजम्या सकट राज्यात फेरफटका मारत असतो. आजोबा आपल्या नातवाला घेऊन फिरत असतात नातू, पाहतो आणि म्हणतो “आजोबा…कैदी…कैदी…पहा परत आपल्याला कैदी दिसला…” आजोबा त्याला अडवतात आणि म्हणतात “अरे हा तर कैदी नाही हा राजा आहे.”
फरक कसा समजायचां कोण राजा आणि कोण कैदी?
आजोबा सांगतात.
जो सैनिकांच्या ताब्यात होता तो ‘कैदी’ आणि ज्याच्या ताब्यात ‘सैनिक’ होते तो ‘राजा’!
मन आपले ‘सैनिक’ आहे की ‘मन’च आपले राजे? हा यशस्वी आणि रडक्या लोकांमधला मूलभूत फरक आहे. आपण मनाचे गुलाम म्हणून जगतो आणि त्याला राजे असणे मानतो! ही मुळात आपली एक सामाजिक समस्या आहे.
जेव्हा आपल्या ज्ञानाची गृहीतकच अज्ञानाने भरलेली असतात तेव्हा समस्या सोडवणे फार कठीण.
मात्र मित्रांनो जगातला सर्वात सुंदर नाद तरंग कोणता? माहीत आहे?
जेव्हा माणसाच्या पायातील अज्ञानाच्या बेड्या तुटण्याचा आवाज हा जगातील सर्वात सुंदर नाद आहे.
हा नाद तुमचा तुम्हाला ऐकू यावा इतकीच ह्या उपक्रमा मागची इच्छा.
आपण आज ‘सॉफ्टवेअर’ तंत्रज्ञानाच्या जगात जगतो जो ‘मोबाईल’ फोन आपण वापरतो त्याची सॉफ्टवेअर प्रणाली वापरण्याचे शास्त्र जसं जाणून घेतो. आपण ते महत्वाचे मानतो.
हे मानवी आयुष्य आपण जगत आहोत तर आपण आपल्यात असलेले सॉफ्टवेअर बनते कसे? आणि त्यात येणारे बग्ज कोणी आणि कसे काढायचे? आजच्या जटिल जगात आपण हे समजून नाही घेतले तर अनेकांची सिस्टीम ‘हँग’ होताना दिसते आहे. आता सोफ्टवेअर समजून घ्यायचे आणि त्याचे वर्जन अपडेट करत राहायचे की कामचलाऊ जगत आपले सॉफ्टवेअर पार ‘आऊट डेटेड’ करून घ्यायचे?
हा ज्याचा त्याचा प्रश्न.
मोबाईल फोन व्यवस्थेत आपण नवीन फोन घेऊ शकतो मात्र ‘शरीररुपी हार्डवेअरचे’ काय? नवीन घ्यायचे की आपले हार्डवेअर आणि ‘सॉफ्टवेअर’ वापरायचे तंत्र समजून घ्यायचे?
की मानायचे ‘आता माझ्यात बदल पुढच्या जन्मी’ तर तुम्हाला पुढील जन्मासाठी शुभेच्छा! तुमचा प्रवास सुखाचो होवो!
पण मेंदू हे ‘शरीररुपी हार्डवेअर’ आणि त्याचे ‘मनरुपी सोफ्टवेअर’ जो शिकला ‘तो’ ह्या जगावर राज्य करू लागतो.
हे मात्र ‘मार्क झुकरबर्ग’ ह्याने दाखवून दिले आहे. मार्क दादा हे कॉम्प्युटर सायन्स सोबतच ‘मानसशास्त्रात’ पदवीधर आहेत. आता हे दोन विषय एकत्र शिकायची सोय त्यांना हार्वर्ड मध्ये झाली मात्र आपल्या देशात आपण हे दोन विषय आर्ट्स आणि सायन्स अशा दोन भिन्न बाजूला ठेवल्याने हे विषय एकत्र शिकायची कदापि शक्यता उरणार नाही, ह्याची जणू ताजविजच केलेली होती. म्हणून तर आपल्याकडे फक्त त्याचे सेवक तयार होतात. आता नवीन शिक्षण प्रणालीमधून असे दोन्ही विषय एकत्र शिकता येतील ही..पण ज्यांचे कॉलेज मध्ये जाऊन शिकायचे वय निघून गेले त्यांनी काय थेट पुढील जन्माची वाट पाहावी का? मुळीच आवश्यकता नाही.
जर ह्या जगात डोकावून पाहायचे असेल तर मात्र आपल्याला ही आर्ट्स आणि सायन्स सारखी कंपार्टमेंट मधून स्वताला बाहेर काढावे लागेल. आणि ‘शिकायचे वय’ मग ‘कमवायचे वय’ आणि मग ‘लग्न करायचे वय’ अशी आपली केलेल्या ‘कंपार्टमेंट’ मध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण हे सुरूच ठेवायची मानसिक तयारी करावी लागेल.त्यासाठी संवेदन तुमच्या सोबत असेल. ‘माझे तर आता शिकायचे वय निघून गेले, म्हणत आमच्याकडे पाठ करत असाल तर मित्रांनो ये पैगाम आपके लिये हे ही नही….अपका आऊट डेटेड सोफ्टवेअर तो बियोंड रीपायर चला गया है!’ त्यांची भेट आता ते पुन्हा शिक्षण घ्यायचां मनस्थिती जेव्हा येतील तेव्हा मग ती परिस्थिती आतच आणायची की भेट आपली पुढील जन्मी’ हे ज्याचे त्यानी ठरवावे.
संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र अशी कोणतीही ‘कंपार्टमेंट’ मानत नाही……जो ज्या वयात शिकायला तयार असेल त्या वयात त्याला शिकवायला आम्ही तयार आहोत.
चालतर मग सुरुवात करूया ‘ह्या’ आपल्या वर्तन शास्त्राच्या म्हणजेच मनाला ओळखायचा प्रवासाला.
मानसशास्त्राच्या जगात तुमचे स्वागत!मनावर आपण अनेक गाणी ऐकली आहेत….मन मनास उमगत नाही…माझिया मना जरा थांब ना….रामदासांनी तर ह्या मनाचे श्लोक लिहिले आणि भगवतगीतेत, अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो मी वायू वेग, वादळ ह्यावर नियंत्रण आणू शकतो पण हे “मन’ मात्र ‘ताब्यात’ राहत नाही….!
आज आपाल्या ..आपल्या आयुष्यातील अनेक पातळ्यांवरील संघर्षात आपलाही अर्जुन झालेलां असतो. त्यामुळे कधी हे मनाचे वादळ अशांतता निर्माण करते तर कधी बेचैनी..कधी उत्साह तर कधी हताश. कोणतेही कार्य सुरू करताना आपण म्हणतो हे करण्याचा आज माझा मुड आहे किंवा नाही. हा मूड म्हणजे काय? आणि हा मूड ठरवतो कोण?
ह्या जगात तुमचा मूड छान केल्या बद्दल आपण अनेकांवर खुश होतो मात्र लक्षात ठेवा…उत्तम यशस्वी आयुष्य जगण्यासाठी ‘हा’ मूड ठरवण्याचे ‘सामर्थ्य’ आपण स्वतः मिळवू शकतो..! हो हे सामर्थ्य प्राप्त करणे हा ‘गाभा’ आहे.
एक उदाहरण पाहूया सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉक जाण्याचा ‘मूड’! सकाळी- सकाळी उठल्यावर भांडण झाले, तर मॉर्निंग वॉक चा मूड निघून गेला असे अनेकजण म्हणतात, मात्र हा मूड चांगला करण्यासाठी तर मॉर्निंग वॉक आहे. हे मानून त्या क्षणी जरी मन खट्टू झाले असेल तरी आपण ठरवलेल्या गोष्टी नियमित करण्याची शिस्त पाळणारे तयार झालो की आपले शरीर देखील साथ देते आणि आपला मूड छान होऊन जातो.
त्यामुळे आपले ‘मन’ आपला मूड नाही ठरवत तर शरीर आपला ‘मूड’ ठरवते कारण आपले ‘मन’ हे आपल्या शरीराचा ‘गाभा’ आहे. ह्या निरोगी सुदृढ शरीरात निरोगी सुदृढ ‘मेंदू’ राहू शकतो. त्यामुळे आपली आरोग्य साधना, त्यावरील शिस्त ज्याने जिंकली त्याचा मूड ही त्याने जिंकलेला असतो.
सामान्य माणसे मूड प्रमाणे जगतात तर ग्रेट माणसे आपला मूड आपण स्वतः ठरवू शकतात! त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात सहज साध्य ‘अँटी डिप्रेसेंट’ म्हणणे ‘रोजचा नियमित व्यायाम’! जे लोक न चुकता व्यायाम करू शकतात ते मनाचे ‘गुलाम’ नाही तर मनाचे खरे खुरे “राजे’ असतात…साहजिकच आयुष्यात यशस्वी ठरण्यासाठी त्यांच्या रॉकेट मध्ये ‘इंधन’ असते.
त्यामुळे मानसशास्त्र हा अनमोल ज्ञानाचा खजिना आहे. हा खजिना आपल्या आयुष्याची दोरी नशिबार सोडण्यासाठी नाही तर आपल्या हाती घेण्यासाठी आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे.”जो मन जिंकतो तो जग जिंकतो!”
मन कसे घडते? मन नेमके काय करते? मन कुठे असते? मनावर ताबा मिळवता येतो का?
वाचा दुसऱ्या भागात!
Edura
August 3, 2023Through this blog, we aim to inspire readers to embrace education as a lifelong journey and to advocate for quality education that empowers individuals and communities.
Edura
August 3, 2023Education News and Trends: We provide updates on the latest developments and trends in the education sector, including educational research,
Edura
August 3, 2023We discuss strategies to help students make informed decisions about their educational and career paths, ensuring they are prepared for success in the workforce.