स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे, परंतु आजच्या काळात ह्या विषयावर खूप कमी बोललं जातं. मात्र या विषयाच्या अभ्यासामुळे मनाच्या विविध अवस्थांना समजून घेणे, स्वत:ला स्वीकारणे आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे सहज शक्य होऊ शकते. भारतात ह्या विषयाचे आकलन कसे होईल ह्या बाबत संशोधनच आजवर झालेले नव्हते. मात्र ह्या विषयाला अवजड इंग्रजीतुन मुक्त करत साध्या सोप्या मराठी भाषेत आणि तुम्हाला कळतील अशी उदाहरणे देत हे ज्ञान आपल्या पर्यंत येण्यासाठी स्कील इंडिया नोंदणीकृत संवेदनच्या मानसशास्त्र अभ्यास केंद्राने तुमच्यासाठी “स्त्रियांचे मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग” हा सेल्फ पेस कोर्स आणला आहे.
या अभ्यासक्रमात आपण खालील विषयांचा सखोल अभ्यास करू:
स्त्री आणि पुरुषाच्या व्यक्तिमत्वातील साम्य आणि फरक, त्यातून निर्माण होणारी आव्हाने आणि उपाय ह्याचा समुपदेशन दृष्टिकोनातून अभ्यास.
मानववंशशास्त्र दृष्टिकोनातून स्त्री मेंदूचा होत गेलेला विकास. स्त्री मेंदू रचनेतील बलस्थाने आणि त्याच्या अभ्यासाचा कौशल्य पूर्ण वापर.
लैंगिंक आयुष्य आणि त्यातील समज गैरसमज आणि आनंदी आयुष्य जगताना ह्यातील समस्यांनी होणाऱ्या अडचणी आणि त्या कशा सोडवल्या जातात ह्याचा अभ्यास.
स्त्रिया आणि कौटुंबिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र.
सामाजिक, आर्थिक बदलांमुळे पिढ्यांचे बदलणारे वर्तन आणि त्यातुन निर्माण होणाऱ्या कौटुंबिक समस्या आणि समाधान.
आई मुलगी, वडील मुलगा, सासू सून, ह्या नात्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास.
छाप पाडणारे प्रभावी व्यक्तिमत्व कसे तयार होते ह्याचा अभ्यास.
व्यक्तिमत्वाचे फ्रॉईड, युंग, एडलर ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांताचा अभ्यास.
भारतीय मानसशास्त्र विचार पद्धती त्यातील राजिसक, तामसिक आणि सात्विक व्यक्तिमत्व प्रकार आणि त्याचा तोलनिक अभ्यास.
व्यक्तिमत्व समूह, गर्दी आणि समाज यांचे परस्पर संबंध. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आणि व्यक्तिमत्वात परिवर्तन होते का?
ह्रदयविकार प्रतिकारक व्यक्तिमत्व असते का? ते कसे कमवायचे? मानसिक तणाव आणि व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वामधील वृत्तीची चाचणी कशी करायची?
व्यक्तिकेंद्रित समुपदेशन पद्धतीचा सखोल अभ्यास.
या अभ्यासक्रमाची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन: तुम्हाला मानसशास्त्रातील जाणकार आणि अनुभवी प्राध्यापक शिकवतील, जेणेकरून तुम्हाला विषयाची उत्तम माहिती मिळेल.
नवीनतम अभ्यासक्रम: हा अभ्यासक्रम आधुनिक मानसशास्त्राच्या सिद्धांतांवर आधारित आहे, त्यामुळे तुम्हाला अद्ययावत ज्ञान मिळेल.
प्रत्यक्ष उपयोगावर भर: फक्त पुस्तकी ज्ञान न देता, हे ज्ञान व्यवहारात कसे वापरायचे हे शिकवले जाईल. उदाहरणे, केस स्टडीज आणि ॲक्टिव्हिटीजच्या मदतीने विषय सोपा करून समजावला जाईल.
हा कोर्स कोणासाठी?
इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, अगदी प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्र हा विषय फार महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रीय ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे. व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी वर येणाऱ्या ज्ञाना पेक्षा ह्या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी ज्ञानी डॉक्टरांकडून अधिकारवाणीने ज्ञान मिळवायची ईच्छा असलेल्या लोकांसाठी हा कोर्स आहे. मानसिक आरोग्य ही महत्वाची धनसंपदा आहे, आपल्या मनाची ताकद कशी वापरू शकतो? ह्या बाबत ज्यांना सखोल ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी ह्या कोर्स मध्ये ज्ञानाचे भांडार आहे.
There are no items in the curriculum yet.
FAQs
विद्यार्थी, शिक्षक, काउंसेलर, मानसशास्त्रात रुची असलेले कोणतेही व्यक्ती हा कोर्स करू शकतात.
कोर्स काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत असू शकतो.