योगशास्त्र आणि मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात मनाची स्थिरता आणि शरीराची शिस्त राखणे ही प्रत्येकासाठी एक मोठी गरज बनली आहे. अनेकांना चालढकल (Procrastination), आळस, निरुत्साह, मानसिक थकवा, मनाची खिन्नता यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागते. “हे टाळायचे आहे” हे माहित असूनही, प्रत्यक्ष कृतीत आणणे जमत नाही. उदाहरणार्थ, सकाळी मॉर्निंग वॉक करायचे ठरवले तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मन आळशीपणाकडे झुकते आणि आपण पुन्हा झोपेचा मोह स्वीकारतो. यावर उपाय कुठे आहे? – याच प्रश्नाचे उत्तर योगशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या संयुक्त अभ्यासातून मिळते.
योगसूत्रामध्ये म्हटले आहे –
“योगस्य चित्तवृत्ति निरोधः”
म्हणजेच मनाच्या विविध वृत्ती शांत करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे.
मानसशास्त्र आपल्याला सांगते की मन शांत ठेवणे आणि त्यावर विजय मिळवणे का आवश्यक आहे. परंतु ते प्रत्यक्ष साध्य कसे करावे हे योगशास्त्र शिकवते. शरीराला शिस्त लावत आणि मनाला योग्य दिशेने नेऊन जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग व मानसशास्त्र यांचा संगम हा सर्वोत्तम मार्ग आहे.
याच उद्देशाने संवेदन मानसशास्त्र केंद्र घेऊन येत आहे विशेष दोन महिन्यांचा “योगशास्त्र आणि मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स”.
🔹 भारतीय योगपरंपरा आणि पाश्चात्य मानसशास्त्र यांचा समतोल अभ्यास.
🔹 मानसिक आरोग्य, शारीरिक शिस्त आणि भावनिक स्थिरता साधण्यासाठी मार्गदर्शन.
🔹 चालढकल, आळशीपणा, निराशा यावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध तंत्रे.
🔹 स्किल इंडिया प्रमाणपत्र मिळणारा मान्यताप्राप्त कोर्स.
🔹 प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते १ लाईव्ह सत्रे, तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ तीन महिन्यांपर्यंत उपलब्ध.
🔹 चर्चासत्रे, गटचर्चा आणि संवाद साधण्यासाठी स्वतंत्र संवेदन ॲप्लिकेशन.
आजच्या जगात प्रत्येकाला शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक शांतीचीही आवश्यकता आहे. फक्त योगाभ्यास करून शरीर सुदृढ होतं, परंतु जेव्हा तोच योग मानसशास्त्राच्या संकल्पनांसोबत जोडला जातो तेव्हा भावनिक आरोग्यही सुधारते.
या कोर्समधून तुम्हाला –
शिस्तबद्ध शरीर आणि शांत मन
सकारात्मक विचारसरणी
भावनिक स्थैर्य
चालढकल आणि आळशीपणावर नियंत्रण
आणि स्वतःला व इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता
असे लाभ मिळतील.
प्रज्ञा माने – सुप्रसिद्ध क्लिनिकल काउन्सिलर, गेली १५ वर्षे कार्यरत.
योग अभ्यासक व भारतातील मोजक्या सायकोसोमॅटिक थेरपिस्ट पैकी एक.
Cognitive Behavioural Therapy, Psychoanalysis आणि योग आधारित ट्रॉमा थेरपी मध्ये सखोल संशोधन.
Psychodrama, Theatre of the Oppressed, Gestalt Theatre यासारख्या कार्यशाळांचे आयोजन.
योगनिद्रा व पतंजली योगसूत्रांवर सखोल काम.
“पाउलखूणा पुरस्कार” (२०१८), “आशा पुरस्कार” (२०२५) आणि SWIPPA, स्वित्झर्लंडचा ‘Young Achievers Award’ यांनी सन्मानित.
१) योग अभ्यास आणि पाश्चात्य मानसशास्त्रीय संकल्पना – गेस्टाल्ट सायकॉलॉजी, सायकोअनॅलिसिस, फ्रॉईड, युंग आणि पतंजली योगसूत्रांचा तुलनात्मक अभ्यास.
२) शारीरिक व मानसिक आघात कमी करण्यासाठी अचेतन मनावर काम करणारा योगाभ्यास.
३) शरीरजाणीवा जागृत करून त्यांना कृतीत बदलण्यासाठी योगाची उपयुक्त साधना.
४) श्वासोच्छ्वास, प्राणायाम आणि मानसिक आरोग्य यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन.
५) मनाचे भावनिक नियमन आणि स्नायुंसंस्था यांच्यावर योगाभ्यासाचा परिणाम.
६) पूर्णभान (Mindfulness) अवस्थेचा अनुभव आणि योगातून साध्य होणारी शांती.
७) चालढकल व आळशीपणा यावर विजय मिळवण्यासाठी योग व मानसशास्त्राचा उपयोग.
८) लहानपणीच्या स्मृती, अचेतन मनातील अडथळे यावर काम करून मनाला नव्याने आकार देणे.
📅 कालावधी – २ महिने
🕚 वेळ – From 6 july – दर रविवारी सकाळी ११ ते १ (लाईव्ह सत्रे)
📲 सुविधा – रेकॉर्डेड व्हिडिओ तीन महिने उपलब्ध, चॅटबॉक्स व गटचर्चा.
🎓 प्रमाणपत्र – स्किल इंडिया सर्टिफिकेट
योगशास्त्र हे शरीर व मन यांची शिस्त घडवते, तर मानसशास्त्र मनाला योग्य दिशा देऊन सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देते. दोन्हींचा संगम म्हणजेच हा विशेष कोर्स, जो तुमच्या आयुष्याला नवा आकार देईल.
👉 आजच नोंदणी करा आणि आपल्या मनाला व शरीराला नवा संतुलित आयाम द्या!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क –
9975769371 / 8767590355
