अर्जुनाप्रमाणे मन गोंधळलेलं असलं, तरी कृष्णासारखा मार्गदर्शक मिळाला तर निर्णय स्पष्ट होतात. भगवद्गीतेतील हेच ज्ञान शिकून तुम्हाला पण EQ कोच म्हणून काम सुरु करायचे आहे का?
1. भावनिक अस्थिरतेपासून ते मनःशांतीपर्यंत — आधुनिक EQ आणि भगवद्गीतेतील कालातीत शहाणपणाचा सखोल अभ्यास करून “EQ Coach किंवा Mindfulness Guide” बनण्याची एक अनोखी संधी.
2. आज तणाव, नातेसंबंध, कामाचा दबाव, भीती–राग यांसारख्या भावनिक आव्हानांमुळे मन भरकटतं. अशा वेळी गीतेतील ‘स्थितप्रज्ञता’, ‘कर्तव्य’, ‘स्व’ची जाणीव हे भावनांना योग्य दिशेने नेण्यासाठी अद्भुत सामर्थ्य देते.
3. जग बदलतंय, जीवनशैली बदलतेय आणि मानसिक अस्थिरता वाढतेय — त्यामुळे “Emotional Intelligence Coach” किंवा “Gita-based Emotional Mentor” ची गरज आज सर्वाधिक प्रकर्षाने जाणवते.
4. हा कोर्स तुम्हाला स्वतःच्या भावनांना समजून घेण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची आणि शांततेने निर्णय घेण्याची क्षमता देतो. गीतेच्या शिकवणींच्या आधाराने तुम्ही स्वतःचं जीवन बदलाल आणि इतरांचंही मन सावरून त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकाल.
भावना या माणसाच्या जीवनाचा गाभा आहेत. आपण कितीही बुद्धिमान किंवा यशस्वी असलो तरी आपल्या निर्णयांवर, नातेसंबंधांवर आणि संघर्ष सोडवण्यावर भावनांचाच सर्वाधिक प्रभाव असतो. आज भावनिक बुद्धिमत्ता (EQ) हा सर्वात महत्त्वाचा जीवनगुण मानला जातो.
परंतु ही संकल्पना नवीन नाही — तिचं मूळ आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. भगवद्गीतेचा सार आणि भावनिक बुद्धिमत्ता याचा समतोल कसा राखायचा याबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून डॉ. राजेंद्र बर्वे सरांनी या कोर्स मध्ये शिकवले आहे.
1. भावनिक बुद्धिमत्ता, मनाची स्थिरता आणि मानसिक स्पष्टता या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी — “EQ कोच”, “Gita-based Mind Mentor” किंवा “Emotional Wellness Guide” म्हणून नवीन प्रोफेशन सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे.
2. स्वतःच्या किंवा इतरांच्या भावनांना समजून घेऊन नातेसंबंध सुधारायचे, तणाव कमी करायचा, जीवन अधिक संतुलित करायचं आहे अशा व्यक्तींसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे — मग ते विद्यार्थी असोत, कामकाजी प्रौढ असोत किंवा घर सांभाळणारे पालक.
3. भगवद्गीतेतील आत्मजाणीव, कर्तव्य, स्थितप्रज्ञता आणि शांतचित्त होण्याच्या शिकवणी आधुनिक Emotional Intelligence सोबत शिकून, जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा कोर्स योग्य दिशा दाखवणारा आहे.
४५ वर्षाहून अधिक काळ मानसोपचारतज्ञ म्हणून कार्यरत असलेले, ज्यांचे मानसशास्त्र विषयावर वर्तमानपत्रात शेकडो लेख प्रसिद्ध आहेत असे, मानसशास्त्रीय विषयावर ४७ पुस्तके प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध जेष्ठ मनोविकासतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे उपक्रमाचे प्रशिक्षक आहेत. ४ पिढ्यांमधील पालकत्वाची बदलती संकल्पना आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याचा जवळून अभ्यास केलेल्या डॉ. राजेंद्र बर्वे सर ह्यांच्याकडून या विषयावर मानसशास्त्रीय पद्धतीने ज्ञान मिळवण्याची संधी देणारा हा कोर्स आहे.
