स्त्रियांचे मानसशास्त्र कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स. आज स्त्री अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडत आहे. करिअर मध्ये यश मिळवत असताना नाती टिकवणे, कौटुंबिक जवाबदाऱ्या, मुलांचे संगोपन हे काही चुकलेले नाही. बदलत्या समाजरचनेत घर, कुटुंब, नातेसंबंध, करिअर आणि स्वतःची ओळख यांचा समतोल साधताना तिच्यावर मानसिक, भावनिक आणि शारीरिक ताण वाढताना दिसतो आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना तिला सामोरे जावे लागते. समाजाच्या अपेक्षा, नात्यांमधील गुंतागुंत, कामाचा दबाव, आत्मसन्मानाशी संबंधित संघर्ष, चिंता आणि असुरक्षितता या सगळ्यांचा तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतो, ह्यामध्ये समुपदेशन खूप महत्वाची भूमिका बजावत आहे.
स्त्रियांचे मानसशास्त्र पुरुषांसारखे नाही मुळात ते सगळ्या स्त्रियांचे ही एकसारखे नाही; ते वय, पिढी, सामाजिक संदर्भ आणि आयुष्याच्या टप्प्यांनुसार बदलत जाते. किशोरवय, प्रौढावस्था आणि मेनोपॉजसारख्या टप्प्यांवर होणारे शारीरिक व भावनिक बदल, तसेच कुटुंबातील आणि वैयक्तिक नातेसंबंधांमधील भूमिका, स्त्रीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतात. नाती जोडणे, जपणे आणि टिकवून ठेवणे ही जवाबदारी अनेकदा स्त्रीकडेच येते, आणि अर्थार्जन आणि कालपरत्वे चालत आलेल्या जबाबदाऱ्या ह्या दोन्हीचा एकत्रतीत परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर खोलवर होतो, तो कसा कमी करावा? ह्याचे शास्त्र समजून घेतल्याशिवाय स्त्रियांचे समुपदेशन करता येणे शक्य नाही.
स्त्री आणि पुरुष यांच्या भावनिक गरजा, शारीरिक संबंधा बाबतच्या अपेक्षा ह्या देखील वेगळ्या असल्याने आणि नात्यांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. हे फरक समजून घेतल्याशिवाय नात्यांमध्ये संतुलन साधता येत नाही. स्त्रियांचे मानसशास्त्र समजून घेणे हे केवळ स्त्रियांसाठी नव्हे, तर जोडीदार, पालक, शिक्षक, समुपदेशक आणि स्त्रियांबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे आणि समुपदेशन करू इच्छिणाऱ्यांसाठी तर ते अत्यावश्यक आहे. आज स्त्री पुरुष समानतेचा चुकीच्या समजात अडकल्याने अंतर्मनात मानसिक कुचंबणा वाढत आहे आणि समुपदेशन अधिकाधिक कठीण होत आहे.
स्किल इंडिया सहयोगी संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्राने २ महिन्यांचा “स्त्रियांचे मानसशास्त्र कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स” अयोजित केला आहे. या कोर्स मध्ये फक्त स्त्रियांचे मानसशास्त्र समजावून न सांगता स्त्रियांसाठी कौन्सिलिंग करताना आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि व्यावसायिक भूमिका स्पष्ट करून त्यावर सखोल अभ्यास करून घेतला जाणार आहे.
प्रशिक्षक :-
डॉ. राजेंद्र बर्वे
गेली ४५ वर्ष मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत, मानसशास्त्रातील विविध विषयांवर ४७ पुस्तके, वर्तमानपत्रात शेकडो लेख लिहिलेले सत्मभलेखक. आय.आय.टी, आय.आय.एम मध्ये प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, टेड एक्स स्पीकर. माईंडफुलनेस उपचार पद्धतीतले सुगतआचार्य. मानसशास्त्राचे भारतीयकरण करण्यासाठी सतत झटत असलेले अभ्यासक. डॉ राजेंद्र बर्वे सर ह्यांनी स्वतः डिझाइन केलेला हा कोर्स त्यांच्याशी थेट चर्चा करत लाईव्ह शिकता येणार आहे.
अभ्यासक्रम :-
- “स्त्रिया अशाच असतात” किंवा “स्त्रीचे मन हळवे” अशा सर्वसाधारण कल्पना का आणि कशा निर्माण झाल्या? आणि अशा जनरलायझेशनमुळे स्त्रीच्या व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम अभ्यासणे आणि समाजात स्त्रियांच्या मनाबद्दल तयार झालेल्या ठराविक समजुती, ‘साचे’ त्यातील समज-गैरसमज शास्त्रीय पद्धतीने पाहणे.
- स्त्रीचे व्यक्तिमत्व भावनिक जडणघडणीतून आणि अनुभवांतून कसे वेग वेगळे घडत जाऊ शकते याचा अभ्यास. बालपणातील अनुभव, कौटुंबिक वातावरण, नातेसंबंध, संघर्ष यांमुळे स्त्रीच्या मानसिकतेमध्ये होणारे बदल आणि ते समजून घेत एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाला स्वीकार देण्याची समुपदेशन कला.
- वयात येण्याच्या काळात भावनिक अस्थिरता, शरीराविषयीची जाणीव, स्वीकार–नाकाराचे अनुभव, असुरक्षितता, भावनिक चढउतार आणि स्वतःची ओळख घडण्याची प्रक्रिया. या सगळ्यांचा स्त्रीच्या आत्मसन्मानावर आणि नातेसंबंधांवर होणारा प्रभाव अभ्यासणे.
- हार्मोनल बदल, मासिक पाळीशी संबंधित समस्या, थकवा, झोपेचे प्रश्न, दीर्घकालीन वेदना, अपराधी भावना, वजनाशी संबंधित समस्या आणि इतर शारीरिक अस्वस्थता यांचा स्त्रीच्या भावनिक स्थितीवर आणि मानसिक संतुलनावर होणारा परिणाम. शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होणारी मानसिक अस्वस्थता, चिडचिड, चिंता आणि आत्मसन्मानावर होणारा प्रभाव ह्याचे दुष्टचक्र समजून घेणे आणि भेदण्याचे उपाय अभ्यासणे.
- मेनोपॉजच्या काळात होणारे हार्मोनल बदल स्त्रीच्या भावनिक आणि शारीरक स्थितीवर आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टीवर कसे परिणाम करतात? मूड स्विंग्स, चिंता, चिडचिड, थकवा आणि आयुष्याच्या अर्थाविषयी निर्माण होणारे प्रश्न या टप्प्याची मानसिक वैशिष्ट्ये अभ्यासणे आणि स्वीकारण्याची कला शिकवण्याचे कौशल्य.
- शारीरिक जवळकीकडे पाहण्याची स्त्री आणि पुरुष यांचे भिन्न दृष्टीकोन, भावनिक सुरक्षितता, स्वीकार, अपेक्षा आणि संवाद यांचे महत्त्व स्त्रीसाठी कसे वेगळे असते आणि त्यातून नातेसंबंधांमध्ये कशी गुंतागुंत निर्माण होते याचा विचार. कपल कौन्सिलिंगमध्ये या फरकांचा कसा विचार करावा याचा केस स्टडीने अभ्यास.
- स्त्री भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा वर्तन, भावनिक प्रतिक्रिया आणि सूचक संकेतांचा कसा वापर करते? या भावनिक भाषेचे अर्थ पुरुषांना कळतोच असे नाही आणि न समजल्यास संवादात गैरसमज कसे निर्माण होतात याचा केस स्टडीने मानसशास्त्रीय अभ्यास. समुपदेशन प्रक्रियेत या सूक्ष्म भावनिक संकेतांना ओळखण्याचे आणि हाताळण्याचे इमोशनल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण.
- आई, पत्नी, सून, मुलगी अशा विविध नात्यांमधून कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ बनत असताना येणाऱ्या समस्या.नाती टिकवण्यासाठी तिच्यावर येणाऱ्या अपेक्षा, तडजोडी आणि भावनिक जबाबदाऱ्यांचा तिच्या मानसिकतेवर होणारा परिणाम.कौटुंबिक समुपदेशनात स्त्रीच्या भूमिकेचा होणारा परिणाम.
- कामाच्या जबाबदाऱ्या, करिअरमधील अपेक्षा, घरातील भूमिका, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज यामधील समतोल साधताना स्त्रीवर येणारा मानसिक ताण. मल्टीटास्किंग, अपराधगंड, सततची तुलना, अपुऱ्या राहिलेल्या इच्छा-अपेक्षा आणि “सगळं जमायला हवं” या दबावाचा स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम. दीर्घकालीन भावनिक थकवा, बर्नआउट आणि त्याचे मानसिक परिणाम.
- आत्मसन्मान, भावनिक सीमा, स्वतःशी सुसंवादी नातं आणि अंतर्गत शांतता यांचे मानसिक आरोग्याशी असलेले नाते. समुपदेशनातून स्त्रीला समाधानाकडे नेणाऱ्या मानसिक प्रक्रिया समजून घेणे.
- स्त्री आणि पुरुष कौन्सिलर म्हणून भूमिका, दृष्टीकोन आणि व्यावसायिक मर्यादा आणि जवाबदाऱ्या त्याचा समुपदेशन प्रक्रियेवर होणारा परिणाम. तसेच संवादशैली, नैतिकता आणि व्यावसायिक मर्यादांचे भान अभ्यासणे तसेच स्त्रियांचे कौसलिंग ह्यावर सखोल अभ्यास.
२० मार्च पासून २ महिने दर शुक्रवारी रात्री ७ ते ९ लाईव्ह चर्चात्मक सत्र आणि रेकॉर्डेड सेशन्स पाहण्यासाठी संवेदनचे ट्रेनिंग एप्लीकेशन, कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना स्कील इंडियाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ९९७५७६९३७१ / ८७६७५९०३५५
There are no items in the curriculum yet.