मानसशास्त्र आणि मॉडर्न कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स A – ॲडलर थेअरी विशेष बॅच
“आपण कोण आहोत, यापेक्षा आपण कोण होऊ शकतो…” या एका विचारात संपूर्ण आयुष्याचा प्रवास बदलण्याची ताकद असते.
आजच्या ‘डिजिटल’ आणि हाय-स्पीड युगात आपण भौतिक प्रगतीची शिखरे तर गाठली, पण या शर्यतीत आपण आपल्या सर्वात जवळच्या मित्राला—म्हणजेच आपल्या ‘मनाला’—कुठेतरी विसरलो आहोत. वरवर पाहता सगळं कसं ‘सेट’ वाटतं, पण घराघरातून हरवत चाललेला संवाद, मुलांची बदलती वर्तणूक, नात्यांमध्ये आलेला दुरावा आणि यश मिळवूनही आतून जाणवणारं रिकामंपण आज प्रत्येकाची सुप्त वेदना बनली आहे.
सोशल मीडियावर हसणारे चेहरे प्रत्यक्षात मात्र ताणतणाव, चिंता आणि अनामिक भीतीने वेढलेले आहेत. मग त्या स्त्रियांच्या भावनिक आणि शारीरिक समस्या असोत, ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा असो वा तरुणाईची अनिश्चितता—मनाचे हे प्रश्न आज घराघरात भिंतीसारखे उभे आहेत. दुर्दैवाने, गुंता वाढल्यावर ‘फुकटचे सल्ले’ देणारे खूप भेटतात, पण शास्त्रीय पद्धतीने हात धरून या अंधारातून बाहेर काढणारे ‘प्रशिक्षित कौन्सिलर्स'(समुपदेशक) आजही खूप कमी आहेत. आज मानसशास्त्र ही केवळ करिअरची गरज राहिलेली नाही, तर तो सुसह्य जगण्याचा आधार बनला आहे.
या सर्व प्रश्नांवर एक ठोस, सकारात्मक आणि कृतीशील उत्तर म्हणजे जागतिक कीर्तीचे मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड ॲडलर यांची विचारधारा! ॲडलर यांचा सिद्धांत सांगतो की—माणूस हा त्याच्या भूतकाळातील जखमांचा गुलाम नाही, तर तो त्याच्या भविष्यातील ध्येयांचा आणि स्वप्नांचा निर्माता आहे. त्यांची ‘इंडिविज्युअल सायकॉलॉजी’ आपल्याला शिकवते की, आपल्या आयुष्यात येणारा न्यूनगंड (Inferiority) आपल्याला थांबवण्यासाठी नसून, तो आपल्याला प्रगतीसाठी (Superiority) प्रेरणा देण्यासाठी असतो. ॲडलर यांचा हा दृष्टिकोन केवळ स्वतःला सावरण्यासाठीच नाही, तर इतरांच्या कोलमडलेल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तुम्हाला सक्षम करतो.
म्हणूनच मानसशास्त्रातील विविध विषयांचे सखोल ज्ञान देण्यासाठी आणि ‘मॉडर्न कौन्सिलिंग’ची प्रभावी तंत्रे शिकवण्यासाठी स्कील इंडिया सहयोगी संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्राने ३ महिन्यांचा “मानसशास्त्र आणि मॉडर्न कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स A – ॲडलर थेअरी विशेष बॅच” हा कोर्स आयोजित केला आहे.
प्रशिक्षक :- श्रीधर कुलकर्णी
अभ्यासक्रम :-
- मानवी मनाची रचना आणि भावना, विचार व वर्तन यांचा एकमेकांवर होणारा परिणाम समजून घेणे. ॲडलरच्या ‘Life Style’ (जीवनशैली) संकल्पनेतून स्वतःच्या मानसिक गरजा ओळखणे आणि सी.बी.टी व पुर्णभान सारख्या पद्धतींचा वापर करून स्वतःच्या विचारसरणीत बदल घडवणे.
- मुलांच्या वाढीचे टप्पे अभ्यासताना त्यांच्या वर्तनामागील हेतू (Goals of Misbehavior) समजून घेऊन. बालपणातील अनुभवांचा आणि कुटुंबातील वर्तणुकीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव अभ्यासून मुलांचे वागणे समजण्यासाठी ‘व्यक्ती-केंद्रित’ तंत्रे शिकणे.
- स्त्रियांच्या विविध भूमिका व सामाजिक अपेक्षांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम अभ्यासणे. ॲडलरच्या संकल्पनेतून स्वतःचे Self-Worth जपणे, भावनिक बदलांच्या व्यवस्थापनासाठी EQ विकसित करणे आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास (Self-Esteem) वाढवण्यासाठी तंत्रांचा अभ्यास.
- नात्यांमधील संवादात येणारे अडथळे आणि विश्वासाची कमतरता यावर अभ्यास. नात्याला ॲडलरप्रणीत ‘Task of Love’ (प्रेमाचे कार्य) मानून, अधिकार गाजवण्याऐवजी समानता, आदर आणि Emotional Security वर आधारित ‘मॅच्युअर’ नाते कसे तयार करायचे?
- वृद्धावस्थेतील मानसिक बदल, वृद्धांना येणारा एकटेपणा आणि बदलेली सामाजिक भूमिका यावर सखोल अभ्यास आणि उपाय. आयुष्याचा सकारात्मक अर्थ शोधून, भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण वृद्धत्व जगण्यासाठी ॲडलरच्या थेअरीचा अभ्यास.
- ताणतणाव व्यवस्थापन – दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे येणाऱ्या ताणाचे मानसशास्त्र समजून घेणे. न्यूनगंडाच्या भावनेतून बाहेर पडून आत्मविश्वासाने जगण्यासाठी स्वतःची क्षमता ओळखणे आणि विविध तंत्रे वापरून मानसिक समस्या सोडवणे.
- काम पुढे ढकलण्याची मानसिकता (Overcoming Procrastination) काम टाळण्यामागची भीती यामुळे येणाऱ्या समस्या आणि Perfectionism म्हणजे नक्की काय?. ॲडलर थेअरीप्रमाणे ‘अपयशी होण्याचे धाडस’ (Courage to be Imperfect) विकसित करणे, आळस झटकून कामावर Focus करणे आणि कृतीशीलता वाढवण्याच्या पद्धती अभ्यासणे.
- तंत्रज्ञानाचे व्यसन आणि आभासी जगाचा मानवी स्वभावावर होणारा परिणाम. ॲडलरच्या ‘Social Feeling’ या संकल्पनेच वापर करून तंत्रज्ञान आणि वैयक्तिक जीवन यात योग्य समतोल राखण्याची समज विकसित करणे.
- चिंता, नैराश्य आणि बदलणाऱ्या मूड्सची लक्षणे ओळखायला शिकणे. मानसिक आजार ओळखून वेळेवर प्रोफेशनल कौन्सिलरची मदत घेण्याचे महत्त्व जाणून घेणे.
- समोरच्याला जज न करता ऐकून घेऊन आणि त्याच्याशी प्रभावी संवाद कसा करता येईल? ॲडलरच्या ‘Encouragement’ (प्रोत्साहन) तंत्राचा वापर करून व्यक्तीला तिच्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणे आणि भावनिक आधार देण्याची कला विकसित करणे.
- वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा मेळ घालून आयुष्यात Emotional Stability कशी आणायची? याचा सखोल अभ्यास. ॲडलरच्या ‘Unity of Personality’ सिद्धांतानुसार मन आणि शरीराचा सुसंवाद साधून मानसिक शांतता कशी मिळवता येते?
- समुपदेशन पद्धतींची निवड – वेगवेगळ्या कौन्सिलिंग थेअरीजचा अभ्यास करून व्यक्तीच्या ‘जीवनशैली’नुसार कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरेल, याचे योग्य नियोजन करायला शिकणे.
There are no items in the curriculum yet.