भगवद्गीतेतील मानसशास्त्र आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी कोच सर्टिफिकेट कोर्स
महाभारताच्या रणभूमीवर उभा असलेला अर्जुन हा फक्त योद्धा नव्हता, तर तो गोंधळलेल्या, भयभीत आणि आतून कोलमडलेल्या मनाचं एक प्रतीक होता.
मी काय करतोय? का करतोय? आणि याचा परिणाम माझ्या मनावर काय आणि कसा होणार आहे? हे प्रश्न आजही प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळ्या स्वरूपात सतत येत असतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली उत्तरं ही केवळ अध्यात्मिक नव्हती, तर ती मानवी मन, भावना आणि निर्णयप्रक्रिया यांची अचूक मानसशास्त्रीय चिकित्सा होती.
आजच्या काळात माणूस माहितीने भरलेला आहे, पण त्याच्यामध्ये अंतर्गत स्पष्टतेचा अभाव जाणवतो. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला जातो, पण मन स्थिर राहत नाही. अशा वेळी भगवद्गीता केवळ अध्यात्मिक ग्रंथ न राहता, मानवी मन समजून घेणारा मानसशास्त्रीय मार्गदर्शक ठरतो.
नकारात्मक विचार, भीती, असुरक्षितता, ताणतणाव, नातेसंबंधातील संघर्ष आणि आत्मविश्वासाचा अभाव हे आजच्या काळातील सामान्य मानसिक अनुभव आहेत. अशा वेळी केवळ प्रेरणादायी शब्द पुरेसे ठरत नाहीत. तर आधुनिक मानसशास्त्र मधील Solution Focused Brief Therapy आणि Acceptance & Commitment Therapy याचा अभ्यास त्या व्यक्तीला सक्षम, स्थिर आणि अर्थपूर्ण जीवनाकडे नेतो. समस्या का निर्माण झाली यापेक्षा, त्या समस्येमधून मार्ग काढून व्यक्ती पुढे कशी जाऊ शकते, स्वतःमधील सामर्थ्य कशा प्रकारे वापरू शकते आणि अर्थपूर्ण कृतीकडे कशी वळू शकते, हाच दृष्टिकोन Solution Focused Brief Therapy आपल्याला देते. जिथे समस्या केंद्रस्थानी न ठेवता उपायांवर लक्ष दिलं जातं.जी आधुनिक मानसशास्त्रात psychological wisdom म्हणून ओळखली जाते.
भगवद्गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे अध्यात्मिक वाटले तरी त्यांचा पाया पूर्णपणे मानसशास्त्रीय आहे. “कर्मण्येवाधिकारस्ते” या तत्त्वातून अपेक्षांपासून मुक्त, मूल्याधारित कृतीची मांडणी होते. हीच भूमिका Acceptance & Commitment Therapy (ACT) मध्ये स्पष्टपणे दिसते, जिथे भावना बदलण्याऐवजी त्या स्वीकारून, स्वतःच्या मूल्यांशी सुसंगत कृती करण्यावर भर दिला जातो. ही मूल्याधारित कृती आणि अंतर्गत स्थैर्य विकसित करणारी मानसिक प्रक्रिया हीच Positive Psychology Coach बनण्याची मूलभूत क्षमता ठरते. अशा कोचिंगमध्ये केवळ सल्ला दिला जात नाही, तर व्यक्तीला स्वतःच्या उत्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी मानसिक स्पष्टता दिली जाते.
आज सोशल मीडियावर आधारित तात्पुरत्या प्रेरणेमुळे क्षणिक उत्साह मिळतो, पण दीर्घकालीन मानसिक स्थैर्य निर्माण होत नाही. यासाठी शास्त्रीय, अनुभवाधारित आणि जीवनाशी थेट जोडलेली मानसशास्त्रीय चौकट आवश्यक ठरते. म्हणूनच Skill India नोंदणीकृत संवेदन – मानसशास्त्र अभ्यास केंद्राने दोन महिन्यांचा भगवद्गीतेतील मानसशास्त्र आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी कोच सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
आधुनिक मानसशास्त्रीय थेरपीज चा समन्वय हा भगवद्गीतेतील प्रज्ञा, विवेक आणि मूल्याधारित जीवनदृष्टीशी साधला जातो. त्यामुळे हा कोर्स स्वतःच्या मानसिक समजा आणि स्थैर्यासाठी तर उपयुक्त आहेच, पण ज्यांना Positive Psychology Coach म्हणून काम करायचं आहे, त्यांच्यासाठीही एक सखोल, शास्त्रीय आणि विश्वासार्ह पाया निर्माण करणारा आहे.
अभ्यासक्रम :-
