1. लहान वयातील संवेदनशील बदलांपासून ते टीन-एज मधील भावनिक वळणांपर्यंत सर्व टप्प्यांचा सखोल अभ्यास करून “चाईल्ड सायकॉलॉजिस्ट किंवा पॅरेंटिंग कोच” बनण्याची संधी.
2. आजच्या काळात मुलांचे बालपण, फोनचा वापर, इंटरनेट, शाळा-कॉलेजमधील बदल, सामाजिक दबाव अशा अनेक घटकांमुळे पालक हतबल होतात.
3. सतत होत असलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक बदलांमुळे “पॅरेंटिंग कोच” ची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
4. ह्या कोर्स मुळे तुम्हाला स्वतःला पालक म्हणून योग्य दिशा मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही इतर पालकांचेही जीवन आनंदी करू शकाल.
सतत होत असलेले सामाजिक, आर्थिक बदल आणि त्याचा पालकत्वावर होणारा परिणाम तसेच मुलांच्या बौद्धिक विकासा सोबत भावनिक बुद्धिमत्तेचा (EQ) चा विकास कसा होतो हे शास्त्रीय दृष्टीकोनातून डॉ. राजेंद्र बर्वे सरांनी या कोर्स मध्ये शिकवले आहे.
1. करियरच्या स्वरूपात “चाईल्ड सायकॉलॉजिस्ट किंवा पॅरेंटिंग कोच” म्हणून नवे क्षेत्र निवडून सोर्स ऑफ इन्कम मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स सुवर्णसंधी आहे.
2. लहान मुले, किशोरवयीन किंवा तरुण मुलांचे पालक, ज्यांना मुलांचा भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकास मानशास्त्रीय पद्धतीने करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी.
3. आधुनिक काळात मुलांच्या संगोपनाकडे सजगपणे पाहू इच्छिणारे तसेच पॅरेंटिंग आणि चाईल्ड सायकोलॉजी चा अभ्यास करून त्यामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी.
डॉ. राजेंद्र बर्वे
४५ वर्षाहून अधिक काळ मानसोपचारतज्ञ म्हणून कार्यरत असलेले, ज्यांचे मानसशास्त्र विषयावर वर्तमानपत्रात शेकडो लेख प्रसिद्ध आहेत असे, मानसशास्त्रीय विषयावर ४७ पुस्तके प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध जेष्ठ मनोविकासतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे उपक्रमाचे प्रशिक्षक आहेत. ४ पिढ्यांमधील पालकत्वाची बदलती संकल्पना आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याचा जवळून अभ्यास केलेल्या डॉ. राजेंद्र बर्वे सर ह्यांच्याकडून या विषयावर मानसशास्त्रीय पद्धतीने ज्ञान मिळवण्याची संधी देणारा हा कोर्स आहे.

