top of page

Health Psychology Certificate Course | in Marathi

About

सतत येणारे आजारपण आणि वाढत्या वजनामागचे कारण मानसीक असू शकते का? कशाही वरून चीड चीड होत राहणे, भांडण झाले की ब्लड प्रेशर वाढणे. प्रयत्न करून ही वजन कमी न होणे. नकारात्मक विचार शरीरात कॅन्सर पेशी ही निर्माण करतात असे संशोधन समोर येत आहे. ह्या आणि अशा अनेक शारीरिक समस्यांमागे मानसिक भाग असतो. डॉ म्हणतात टेन्शन घेऊ नका पण "मला कशाचेच टेन्शन नाही, कळतच नाही मी नेमके कशाचे टेंशन घेतोय?' असा अनेकांचा अनुभव आहे. अनेकजण मनस्थिती नसेल तर व्यायमाचा कंटाळा करतात, रोजचा मॉर्निंग वॉकही चुकतो. आपली मनस्थिती अशी नेमकी का होते? किंवा काहीजण स्वतःचे उत्तम आरोग्य कसे राखू शकतात? ह्यावर अनेक वर्ष मानसशास्त्रीय संशोधन होऊन हेल्थ सायकॉलॉजी ही ज्ञान शाखा उदयाला आली आहे. आजवर आपल्या पर्यंत हे ज्ञान पोहोचलेच नाही मात्र आता आपल्याला हा विषय तीन महिन्याचा सर्टफिकेट कोर्स द्वारे शिकता येणार आहे. स्किलइंडियाची रजिस्टरड पार्टनर असलेली संवेदन प्रशिक्षण संस्थेच्या मानसशास्त्र अभ्यास केंद्रातर्फे ह्या विषयावर तीन महिन्याचा सर्टफिकेट कोर्स आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ राजेंद्र बर्वे ज्यांची मानसशास्त्रीय विषयातील पस्तीस पुस्तके प्रसिद्ध असून, वेग वेगळ्या वृत्तपत्रात शेकडो लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचा चाळीस वर्षांच्या अनुभव पोतडीतून, ह्या विषयाची मांडणी साध्या सोप्या मराठी भाषेतून, ऑनलाईन लाईव्ह, चर्चात्मक पद्धतीने होणार आहे. मटा कल्चर क्लब उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. वेगवेगळ्या शरारिक समस्या आणि त्यांची मानसिक कारणे तसेच कशा प्रकारे मनस्थिती बदलून आपण ह्या आरोग्य समस्यांवर विजय मिळवू शकतो किंवा कोणत्या प्रकारची मनस्थिती शरारीक व्याधींनाही आपल्या पासुन दूर ठेवते, ह्यावर सखोल मार्गदर्शन ह्या उपक्रमात होणार आहे.

You can also join this program via the mobile app. Go to the app

Price

₹6,000.00

Group Discussion

This program is connected to a group. You’ll be added once you join the program.

Health Psychology Certificate Course | Marathi

Health Psychology Certificate Course | Marathi

Private4 Members

Share

bottom of page