आजच्या आधुनिक काळात स्त्रियांचे मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कामकाज, कुटुंब, समाज आणि नातेसंबंध यांचा समतोल राखताना अनेक वेळा स्त्रियांना मानसिक ताणतणाव, भावनिक संघर्ष आणि विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. या सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित आकलन आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्त्रिया आत्मविश्वासाने व सकारात्मकतेने आयुष्य जगू शकतात.
यासाठीच “स्त्रियांचे मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स” हा स्कील इंडिया नोंदणीकृत Sanvedan Gurukul तर्फे तयार केलेला मराठीतला खास सेल्फ-पेस कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
स्त्री आणि पुरुष व्यक्तिमत्वाचा तुलनात्मक अभ्यास – त्यातील साम्य, फरक आणि समुपदेशनाच्या मदतीने येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे मार्ग.
स्त्री मेंदूचा विकास – मानववंशशास्त्रीय दृष्टीने स्त्री मेंदूतील बलस्थाने आणि त्यांचा योग्य वापर.
लैंगिक जीवनाचे मानसशास्त्र – समज-गैरसमज दूर करून आनंदी वैवाहिक जीवन घडवण्याचे मार्ग.
कौटुंबिक नातेसंबंधातील मानसशास्त्र – आई-मुलगी, सासू-सून, पती-पत्नी, पिढ्यांतील बदल आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न.
व्यक्तिमत्व सिद्धांत – फ्रॉईड, युंग, एडलर या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे सिद्धांत.
भारतीय मानसशास्त्र दृष्टिकोन – राजसिक, तामसिक, सात्विक व्यक्तिमत्व आणि त्यांचा जीवनावर होणारा परिणाम.
व्यक्तिमत्व विकास व समाज – व्यक्तिमत्व, समाज, गर्दी व त्यांचे परस्पर संबंध.
तणाव व्यवस्थापन – मानसिक तणाव, वृत्तीचे परीक्षण आणि हार्ट-प्रोटेक्टिव्ह व्यक्तिमत्वाची निर्मिती.
व्यक्तिकेंद्रित समुपदेशन – प्रॅक्टिकल लेव्हलवर समुपदेशनाची पद्धत आणि तिचा प्रभाव.
तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन – अनेक वर्षांचा अनुभव असलेले मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक तुमच्यासाठी शिकवतील.
नवीनतम अभ्यासक्रम – आधुनिक मानसशास्त्राच्या सिद्धांतांवर आधारित.
व्यवहार्य ज्ञान – फक्त पुस्तकी माहिती नव्हे, तर केस स्टडीज, उदाहरणे आणि ॲक्टिव्हिटीजद्वारे प्रत्यक्ष आयुष्यात कसे लागू करायचे ते शिकता येईल.
संपूर्ण ऑनलाईन अॅक्सेस – मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर लाईफटाईम अॅक्सेस.
मनी बॅक गॅरंटी – कोर्स आवडला नाही तर ४८ तासांत परतावा.
स्कील इंडिया मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
मानसशास्त्रात रस असणारे विद्यार्थी.
मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि स्त्रियांच्या समस्यांमध्ये काम करणारे व्यावसायिक.
स्त्रिया, गृहिणी आणि कार्यरत महिला ज्यांना स्वतःला अधिक चांगले समजून घ्यायचे आहे.
इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फॅशन, फायनान्स अशा क्षेत्रात काम करणारे ज्यांना मानसशास्त्राचे ज्ञान आपल्या करिअरसाठी वापरायचे आहे.
मानसिक आरोग्य व व्यक्तिमत्व विकासाबद्दल सखोल ज्ञान हवे असलेले प्रत्येकजण.
👉 स्त्रियांचे मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स हा कोर्स तुमच्या मनाला, नातेसंबंधांना आणि करिअरला नवा दिशा देईल. आजच नावनोंदणी करा आणि स्त्रियांच्या मानसशास्त्राची खरी ताकद जाणून घ्या
