
सध्या शेअर बाजारातील वातावरण पाहून बरेच गुंतवणूकदार हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. अनेक जण काय करूया म्हणून सल्ला विचारायला येत आहेत, 23 तारखे नंतर गुंतवणूक करू म्हणून अनेक जण वाट पाहत आहेत आणि सध्याचा पडझडीला घाबरलेले ही अनेक आहेत. ह्या सर्वाचा गुंतवणूक प्रवास जरा सुसह्य करावा म्हणून आज लिहायला घेतलं आहे.
हे जे कोणी म्हणतायत इलेक्शन च्या निकाला नंतर गुंतवणूक करूया वगैरे हे सगळे नवखे गुंतवणूकदार आहेत.
शेअर बाजारात मुरलेल्या आणि मुरब्बी गुंतवणूकदारांसाठी मोठा सेल लागलेला आहे, ज्यात भरभरून दीर्घ मुदतीची खरेदी हे मुरब्बी लोक बिनदिक्कत करत आहेत.
आता तुम्ही म्हणाल समजा स्थिर सरकार नाही आलं तर काय ?
केवढं नुकसान होईल नाही का? हा झाला शेअर बाजारातील अत्यंत नवखा असल्याचा विचार !
मला सांगा,समजा अगदी मोदी निवडून नाही आले तर असे किती लोक आहेत जे टूथ पेस्ट वापरणं बंद! गाडी वापरणं बंद ! चहा पिणं बंद! औषधाच्या गोळ्याही बंद! स्थिर सरकार नाही त्या देशात जगणंच बंद ! अस होईल असं वाटतं का? ह्या एकशेवीस कोटींच्या देशात असे किती लोक असतील, जगणच सोडून देणारे ? आणि हे मी का विचारतोय तर शेवटी शेअर बाजारात होणारा फायदा हा ठरतो कशावर कोण देश चालवतो ह्यावर का व्यवसाय वाढीवर? त्यातलं आकारमान तर वाढतच आहे की!
मोदी पंतप्रधान झाले काय किंवा अगदी मायावती झाल्या काय!
लोक साधा एक दिवस अन्न त्याग तरी करतील का?
अहो आपली अर्थव्यवस्था जागतली सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे. लोकसंख्या आणि विकत घेण्याची क्षमता असलेल्यांची वाढती क्षमता आणि त्यांची वाढणारी संख्या ही आपली ताकद आहे! हे झालं आमचं फंडामेंटल लॉजिक पण आजकालचे नवखे डेटा मागतात तर डेटा काय दाखवतो स्थिर सरकार असेल तरच शेअर बाजार वाढतो हे कोणी संगीतलं ? असं तर मुळीच घडलं नाहीए!
इतिहास म्हणाल तर 1989 ते 1999 ह्या दहा वर्षात सहा वेळा पंतप्रधान बदलेले गेले आणि ह्याच दहा वर्षात शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 1989 साली 714 होता तो 1999 साली 3893 झाला ! 545 % परतावा !
म्हणजे आकडेवारी तर दाखवते सहा वेळा पंतप्रधान बदललेले तर दहा वर्षात 5 पाटीहून जास्त पैसे वाढतात!
आणि इंजिनियरिंग करून बरी नोकरी न मिळवता आलेले आणि मग महागडं एमबीए करून वित्त विश्वात बाजार विश्लेषक झालेले, अर्धवट राव म्हणतायत स्थिर सरकार येत आहे का पाहूया!
शेअर बाजारातील गुंतवणूक ही सिंहाला राजा बनवणारी असते! कारण सिंह धोरणी,कणखर आणि ठाम आत्मविश्वासाने निर्णय घेतो! कोल्हा मात्र संधी साधू, लचकेतोडुन पळण्याची स्वप्न पाहणारा. वेळ पाहून खेळ मांडू पाहणाऱ्या ह्या कोल्हाना शेअर बाजार अशी काय अद्दल घडवतो की बाप जन्मात परत शेअर बाजाराच नाव काढायची हिम्मत कोल्हे करत नाहीत!
म्हणून असं म्हटलं जातं की नेव्हर टाईम दी मार्केट, स्पेंड मोअर टाईम इन मार्केट!
मी डोळे उघडल्या पासून घरात फक्त शेअर बाजारच पाहत मोठा झालो, शेअर बाजारातील मी तिसरी पिढी आहे!
आणि माझ्या अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर मी हे ठामपणे सांगू शकतो की शेअर बाजारातला परतावा हा केवळ अनिश्चिततेत स्थिर राहणार्यांचा आहे!
हे क्षेत्रच अनिश्चिततेत भरघोस परतावा देणारं आहे!
सगळं सुरळीत आणि स्पष्ट आणि सुसह्य झालं की मिळणारा परतावा ही अनिश्चचिततेत मिळतो, तेवढा उरलेला नसतो!
माझ्या एका गुजराथी मित्राने सांगितलेलं उदाहरण मला इथे सांगावंस वाटतं, कारण मराठी माणसाने गुजराती लोकांकडून ह्या बाबत खूप शिकणं गरजेचं आहे, हे मी नेहमीच म्हणतो. आपण एखाद्या हिल स्टेशन वर सुटीच्या दिवशी सैर करायला गेलो आणि खुप धुकं असेल तर जास्तीत जास्त लोक धुकं कमी व्हायची वाट बघत थांबतात.
मात्र असे फार कमी लोक असतात जे म्हणतात की कितीही धुकं असलं तरी दहा मीटर तरी पुढचं अंतर हे दिसत असतं ! म्हणून सावधपणे अगदी धिम्या गतीने ते गाडी वर नेत राहतात. अर्ध अंतर पार होई पर्यंत धुकं ही कमी झालेलं असत, मग त्यांना ट्राफिक लागत नाही, त्या उंचीवरून सुटीचा खरा आनंद, गाडी चालवायचा आनंद, निसर्गाचं अनोखं रूप हे त्यांनाच पाहायला मिळत, ज्यांनी धुक्यात गाडी चालवायचा निर्णय घेतला.
आता धुकं वीरल्यावर खाली थांबलेले गाड्या घाटात चढवायला घेतात आणि बंपर टू बंपर प्रचंड ट्राफिक मध्ये प्रवासाचा मनमुराद आनंद घेतात, ‘आलोच अहोत इथ पर्यंत, तर जाऊ वर!’ किंवा ‘अडकलोय मध्ये तर आता परत तरी कस जाणार’ ह्या विचारात सुटीचा विचका करून घेतात.
असा विचका करून घेणारे 95 % असतात, तर केवळ 5 % हे धुक्यात गाडी चालवण्याचा निर्णय घेतात!
शेअर बाजारातील भरगोस परतावा हा मात्र धुक्यात गाडी चालवणाऱ्यांचा असतो!
समीर मीलन दिघे
7385807119
लेखक हे वित्तीय-मानसशास्त्र ह्या विषयाचे अभ्यासक आणि प्रशिक्षक आहेत.
शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe
शेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत. ज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न...
इन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड ! by Sameer Dighe
२५० हुन अधिक कार्यक्रम गुंतवणूक साक्षरते बाबत घेतल्यामुळे अनेक वेग वेगळी माणसं आणित्यांचा वेग वेगळ्या शंका ऐकाव्या लागतात, त्यात काहीही गरज नसताना इन्शुरन्स विकत घेतलेले महाभाग, तर कधी अगदी काही जाणांना लोन घेऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करायचा फुकटचा सल्ला बँक कर्मचारी...
Mobile Training Workshop
आपल्या घरात कोणी ना कोणी आज्जी आजोबा किंवा तुमचे आई बाबा तुम्ही आज जितके मोबाईल ह्या गोष्टीपासून जवळ आहात, तुम्हाला जितका मोबाईल वापरणं सोप जातंय तितकं त्यांना जात नाहीए असं वाटत असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे. आज भारताचं आयुर्मनच वाढलंय सरासरी भारतीय माणूस ७८...
Maharashtra Institute of Labour Studies (MILS) – FAQ, Entrance exam preparation & Resources
Maharashtra Institute of Labour studies is one of the most prominent institute for management courses. It is one of the oldest institute of management in India. Here are some of the FAQ's What are the fees for one academic year in MILS?...
0 Comments