इन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड ! by Sameer Dighe

by | Jan 6, 2019 | Uncategorized | 5 comments

२५० हुन अधिक कार्यक्रम गुंतवणूक साक्षरते बाबत घेतल्यामुळे अनेक वेग वेगळी माणसं आणित्यांचा वेग वेगळ्या शंका ऐकाव्या लागतात, त्यात काहीही गरज नसताना इन्शुरन्स विकत घेतलेले महाभाग, तर कधी अगदी काही जाणांना लोन घेऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करायचा फुकटचा सल्ला बँक कर्मचारी देतात!
म्हणून म्हटलं जरा ह्यावर सविस्तर लिहावच,जर तुम्हा लोकांना आवडलं तर नक्की कळवा ह्या विषयावर अधिक ही लिहित राहीन.
तर आज पहिल्या भागात सुरवात करूया इन्शुरन्स आणि गुंतवणूक ह्यातील समज गैर समजा पासून…
एक महत्वाची गोष्ट म्हणून प्रत्येकानी इन्शुरन्स काढायला हवा, हे भारतात एजंट कृपेमुळे मना मनात पटलेली बाब! पण मुळात विचारात सखोलता नाही,म्हणून इन्शुरन्स चा अर्थ काय ? किंवा त्याची आपल्याला गरज आता उरली आहे का ? आणि गरज असल्यास किती गरज आहे? ह्यावर मात्र विचार करायचा बहुदा राहूनच जातो!(अनेकांचा जिवलग मित्र किंवा अगदी मेव्हणा एजंट असतो, मग विचार बंद करूनच करायची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स, हे मुळात अंतर्मनाच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहोचलेल असतं !)


तर मुळात इन्शुरन्स हा रिटायर्ड झालेल्या किंवा रिटायरमेंटला आलेल्या अनेकांनी नुकताच घेतला आहे, असे लोक हमखास भेटतात ! ह्यांच्याशी गप्पा मारल्या तर जाणवतं की कर्ज फिटली आहेत , मूलं ही कमावती आहेत, ह्यांच्या कडे रिटायरमेंट चे 30 एक लाख ही आलेले आहेत, असे पेन्शनर आजोबा लाईफ इन्शुरन्स घेत आहेत ! माझा साधा प्रश्न असतो तुम्हाला ह्या गोष्टीची गरज काय आहे? आता ह्यांना कस सांगायचं की चुकून तुमचं बरं वाइट झालंच तर तुमच्या वाचून काही आर्थिक गोष्टी आता अडणार आहेत का ? तुम्ही आता कमावते तरी उरले आहात का?
इन्शुरन्स ही कोणाची गरज असते?…की जो कमावता आहे, ज्याच्या मागे तीन ते चार लोक अवलंबून आहेत, ज्याला घराचं कर्ज आहे, मुलांची शिक्षण, लग्न अजून बाकी आहेत आणि अश्या परिस्थितीत ती व्यक्ती तीच्या कमाईने, हे सर्व पूर्ण करू शकत असेल तर त्या व्यक्ती ला इन्शुरन्स खरच गरजेचा आहे ! कारण त्या व्यक्तीच्या असण्यावर अनेक जण अवलंबून आहेत. आता जर साधारण ४० ते ५० हजार कमावणारी तिशीच्या आतली व्यक्ती असेल, तर त्याची हीच इन्शुरन्स ची गरज १ कोटी ची तरी असते आणि ह्या उत्पन्न गटातील चाळीशी च्या व्यक्ती ची ५० लाख तरी असते, जी टर्म इन्शुरन्स, अगदी भारतात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक इन्शुरन्स कम्पनीचा,मासिक हजार रुपायाच्या आत मिळू शकतो मात्र त्याची माहिती मिळत नाही !
ह्याचं कारण सरळ आहे ज्या वर २० ते २५ % कमिशन आहे ती गोष्ट विकली जाईल की ज्यावर ०.५ % कमिशन आहे ती?
आता ह्यात गंमत अशी की ह्यातून पैसे परत मिळत नाहीत, जी टर्म ठरवली जाते, ती पूर्ण व्हायच्या आत जर काही झालं तर आणि तरच ती इन्शुरन्स रक्कम अवलंबित व्यक्तींना मिळते! म्हणजे काय ? तर , जर नियोजित टर्म पूर्ण केली, तर एक रुपया ही परत मिळणार नाही! ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही! आणि जी गोष्ट आपण हजार रुपयात घेऊ शकतो ती न घेता 3 ते ४ हजार घालवतो आणि तेवढ्या रकमेत १० लाखाच्या वर काही इन्शुरन्स मिळत नाही, “मात्र ती रक्कम परत मिळते ना!” अहो पण २५ ते ३० वर्षा नंतरचे १० लाख आहेत ते!..महागाई चा दर लक्षात घेता तेव्हा त्याला कितीशी किंमत असेल?.. आणि परत मिळवायला साधारण तुम्ही तितकीच रक्कम भरताय ह्याचा मुळात विचारच होत नाही ! हीच गोष्ट,जर आपण वेग वेगळी घेतली तर एक हजारात आपल्याला टर्म इन्शुरन्स एक कोटी चा आणि उरलेल्या ३ हजाराची वेग वेगळ्या फंडात ३० वर्ष SIP म्युच्युअल फंडात केली तर ती करोडोची रक्कम मिळवून देणारी ठरते!
आता काही हुशार एजंट टर्म आणि मनी बॅक अश्या दोन्ही स्कीम एकत्रपणे विकायला लागले आहेत, ते म्हणजे असं की मासिक ५०० रुपयाचा ५० लाखा चा टर्म प्लॅन आणि अडीच ते तीन हजार रुपयाचा मनी बॅक ज्यातून १० लाख कव्हर नाहीतर १० लाख परत!
पण हेच अडीच ते तीन हजार गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने म्युच्युअल फन्ड SIP ने कैक पट अधिक रक्कम आपण मिळवू शकतात !
पण आपल्याला आपल्या जिवलग एजंट मित्राचा फुकटचा सल्ला आवडतो, आर्थिक सल्लागाराकडे जाण्या पेक्षा! मग त्या फुकट मिळालेल्या सल्यावर, एजंट मित्र गलेलठ्ठ कमिशन कमावून आपण मात्र ,ज्या रकमेतून ह्या दीर्घ मुदतीत काही कोटी रुपये ही मिळवता येतील, ती संधी गमावून बसतो, आणि अनेक वर्षांनी लक्षात येते की आपण घेतलेल्या इन्शुरन्सच्या जीवावर आर्थिक स्थैर्य आपलं नाही तर आपल्या एजंट मित्राला मात्र नक्की आलेलं असतं !
आता मुद्दा सगळ्या जवाबदार्या पार पडून झाल्यावर, आपले पैसे उतार वयाच्या सोयीसाठी महागाई लक्षात घेऊन वाढीसह साठवता यावेत, ही ज्यांची गरज आहे ते लोक ” फुकट मिळत होता इन्शुरन्स, गुंतवणुकीवर ना..म्हणून घेऊन टाकला! “असं जेव्हा एखादे साठीला आलेले काका मला म्हणतात, तेव्हा मात्र काय बोलावे ह्यांना अशी अवस्था होते माझी. आपल्या भारतात म्हणीच तश्या आहेत, त्या संस्कारच तश्या करतात, ‘मुफ़्त का चंदन घिस मेरे नंदन ! ‘ किंवा ‘फुकट ते पौष्टिक!’
ह्या कुपोशीत विचार संस्कृतीच्या जोरावरच, २०० वर्ष इंग्रज राज्य करू शकले अपल्यावर, ह्याची खात्री पटते! कारण इंग्रजीत म्हण आहे, ‘Free is costly!’
कसं आहे..विचार करायचा मुळात आळस आणि त्यात आपण कसं फुकटात काहीतरी मिळवलं ह्याचा शहाणपणा मिरवायची हौस! मग काय हवं अजून, “मूर्खांची कमी नाहीचे भारतात, एक शोधा हजार मिळतील” हे इंग्रज साहेब किती विचारीपणे बोलायचे, ह्याची खात्री पटते.
जगात कोणीच कोणाला काहीही मोफत देत नसतो, जर आज मोफत देत असेल तर त्या बदल्यात आपण काहीतरी त्याला देत असू किंवा देणार असू, ह्याची त्याला खात्री असते, मग ते फुकट मिळालेलं फोन वरील ऍप असो किंवा इन्शुरन्स का असे ना!…
ULIP म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन, आता ह्यात तुमची गुंतवणूक शेअर बाजारात होते, मात्र त्यातुन तुमचा इन्शुरन्स चा हप्ता ही जातो ! ही बाब कोणीच लक्षात घेत नाही , १४ % परतावा आहे! आणि इन्शुरन्स फ्री!इतकच सांगितलं जातं.
पण दर वर्षी, गुंतवलेल्या रकमेच्या ८ ते ९ % पर्यंत च्या रकमेचा इन्शुरन्स चा प्रिमियमच जाणार असतो! हे गुपित कोणीच एजंट सांगत नाही !
कसं असतना..भारतात व्यवसाय करण्या मगच एक सूत्र आहे ‘खर जरूर बोलावं.. पण सगळंच खर बोलून दाखवू नये!’ हे सूत्र ज्या एजंट ला काळांल की बास सगळ्या टेबलाचा तो हक्कदार झालाच !
तसच हे ही .. मानून चालूया तुम्हाला अगदी १४ % वार्षिक परतावा मिळाला ही, तरी त्यातले ८ ते ९ % रक्कम जर प्रिमियम चुकवण्यात जाणार असेल त्या इन्शुरन्स चा, तर उरलं काय ? आणि समजा एखाद्या वर्षी मार्केट ने चांगला रिटर्न नाही दिला तरी तुमचा प्रिमियम मात्र नक्कीच जाणार असतो ! हे फिक्स असते..मग अनेक वर्षांनी जाणवत की माझे पैसे वाढतच नाहीयेत….अहो तुम्ही मुफ़्त का चंदन घेतलात ना…मग ती त्या ‘मुफ़्त’ ची ती किंमत आहे….!
बाजारात कोणी पांढरा हत्ती दिला मोफत तरी घेऊन याल, पण त्या हत्ती ला पोसायला तर लागेलच ना ! तसचं असतं इंशुरन्स चं ही, तो मोफत दिलाय मला गुंतवणूकीवर पण त्याला पोसायची सोय तुमच्याच गुंतवणूकी च्या जोरावर करून ठेवलेली असते ULIP सारख्या स्कीम मध्ये.

आता आणखी काही जण असतात जे स्वतः ला अर्धवट ज्ञाना पोटी अक्कलवान समजतात, माणसांनी एकवेळ अज्ञानी असावं ते परवडतं, पण हे अर्धवट ज्ञानी महाभाग काही ऐकत नाहीत कोणाच! आणि इतकंच नाही इन्शुरन्स कम्पनी ला बुडवू पाहण्याचं स्वप्न हे महाभाग पाहत असतात!
त्या लोकांसाठी इन्शुरन्स कंपन्यांनी वयाच्या ८० व्या वर्षा पर्यंत टर्म इन्शुरन्स म्हणून स्कीम आणली आहे !
“मी काय ८० वर्षा पर्यंत जगणार नाही पण एक कोटी तरी घरच्यांना देऊनच मरीन!” ह्या थोर विचाराला आधी माझा साष्टांग नमस्कार! अहो इन्शुरन्स ही गोष्ट तुम्ही, जो पर्यंत कमावते आहात , त्या टर्म पुरती महत्वाची असते, तुमच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेतून ही इन्शुरन्स चा हप्ता जाईल अशी वेळ का आणावी स्वतः वर ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, भारताची लाईफ एक्सपेकटन्सी वाढत चाललेली आहे! आज युरोपात, जपान मध्ये माणूस शम्भरी सहज गाठतो, हे का शक्य झाले तर आरोग्याचा सुविधा, ज्या अपल्याकडे ही आता बऱ्याच चांगल्या मिळालायला लागल्या असून गोळ्या-औषध घेत,भारतातही ८० वर्ष माणूस सहज जगायला लागलेला आत्ताच दिसू लागलेलाे आहे! मग आज जर तुम्ही तिशीत असाल तर तुमची जगायची शक्यता ८० च्या वरचीच जास्त आहे! आणि सगळ्यात किमती ह्या जगात पैसा नसून जीव आहे!
मग स्वतः मरून,घरच्यांना श्रीमंत आणि कम्पनी ला तोट्यात टाकायची स्वप्न पाहत बसणारी ही माणसं तीच असतात, जी अनलिमिटेड बफे मध्ये जाऊन आपला आनंद फक्त महागडया पदार्थावर आचरटा सारखा ताव मारण्यात आहे,आणि का तर, आपला उद्देश स्वतः आनंद मिळवण्या पेक्षा त्या बफेटच्या मालकाला बुडवणे हा मानतात आणि स्वतः वर हगवणी ची वेळ आणून ठेवतात !
हा दोष मानसिकतेत आहे, स्वतः पैसे कसे कमवता येतील, अश्या सकारत्मक विचारापेक्षा, समोरच्याला खड्यात टाकून मी कसा श्रीमंत होईन अशी स्वप्न पाहणाऱ्या विद्वान लोकांसाठी, कंपन्या ६० वर्षाच्या वरच्या वयाचा टर्म इन्शुरन्स घेणार्यांना २० ते ३०% अधिक चा प्रिमियम त्यांच्या ८० व्या वर्षी पर्यंत भरायला लावतात… मग ही मंडळी आयुष्यभर तर झुरत राहतातच पण ८० व्या वाढदिवसाची तब्येतीने धडधाकट असल्याची गंमत! ही माणसे माझे टर्म इंशुरन्स चे पैसे वाया गेले ह्या विचारात बेचव करून घेतात.

समीर मीलन दिघे
sanvedan.com
7385807119
( लेखक महाराष्ट्र पोलीस तसेच अनेक कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणारे मानसशास्त्रीय प्रशिक्षक व गुंतवणूक सल्लागार आहेत)

5 Comments

 1. संजय आत्माराम पटवर्धन

  आजच्या म टा मधे शेअर बाजार कार्य शाळेबाबत वाचले. अशा कार्य शाळा प्रत्यक्ष केव्हा चालू होतील. म टा कल्चर क्लब मेंबर खेरीज इतरांसाठीही अशा कार्य शाळा आयोजित केल्या जातात का? त्याची फी वगैरे माहीती कुठे मिळेल? सध्याची करोना परिस्थीती संपल्यावर अशा कार्यशाळा चालू होतीलच, होय ना?

  Reply
 2. C R SAMARTHWAD

  Thanks Sir for sharing your knowledge……

  Reply
  • Team Sanvedan

   Thanks please keep coming for more blogposts and do share our posts 🙂

   Reply
 3. Vineet

  Really , its an eye opener

  Reply
  • Team Sanvedan

   Thanks please keep coming for more blogposts and do share our posts 🙂

   Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

अनिश्चितता आणि शेअर बाजारात गुंतवणूक!

सध्या शेअर बाजारातील वातावरण पाहून बरेच गुंतवणूकदार हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. अनेक जण काय करूया म्हणून सल्ला विचारायला येत आहेत, 23 तारखे नंतर गुंतवणूक करू म्हणून अनेक जण वाट पाहत आहेत आणि सध्याचा पडझडीला घाबरलेले ही अनेक आहेत. ह्या सर्वाचा गुंतवणूक प्रवास जरा...

शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe

शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe

शेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत. ज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न...

Mobile Training Workshop

आपल्या घरात कोणी ना कोणी आज्जी आजोबा किंवा तुमचे आई बाबा तुम्ही आज जितके मोबाईल ह्या गोष्टीपासून जवळ आहात, तुम्हाला जितका मोबाईल वापरणं सोप जातंय तितकं त्यांना जात नाहीए असं वाटत असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे. आज भारताचं आयुर्मनच वाढलंय सरासरी भारतीय माणूस ७८...