Mobile Training Workshop

by | Apr 13, 2018 | Uncategorized | 1 comment

आपल्या घरात कोणी ना कोणी आज्जी आजोबा किंवा तुमचे आई बाबा तुम्ही आज जितके मोबाईल ह्या गोष्टीपासून जवळ आहात, तुम्हाला जितका मोबाईल वापरणं सोप जातंय तितकं त्यांना जात नाहीए असं वाटत असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे.
आज भारताचं आयुर्मनच वाढलंय सरासरी भारतीय माणूस ७८ वर्षां पर्यंत जगतोय हे आकडेवारी दाखवत आहे, मग जर जगायचं आहेच रिटायर झाल्यावरही २० एक वर्ष हे दिसतंय तर मग मोबाईल ही गोष्ट आज लाईफ स्किल आहे, आजच्या काळात जगण सोपं केलंय ह्या मोबाईलनी आणि इथूनपुढे ही प्रत्येकाची गरज बनणार आहे.
हा काळ म्हणजे डिजिटल युग आहे, ज्या वेगाने मोबाईल आलाय आणि आपण आपला एक नवीन उत्क्रांत झालेला अवयवच आज त्याला मानत आहोत, पण अनेक जण ह्या मोबाईल सोबत तितके कम्फर्टेबल नसतात, त्यांना हा फोन नक्की धरायचा कसा असतो इथपासून शिकवण गरजेचं असतं त्याच्यासाठी ही कार्यशाळा आहे.
आपल्या जेष्टनागरीकांची ज्या काळात जडण घडण झाली तो काळ आणि आजचं हे डिजिटल युग ह्यात खूप फरक आहे.
विचार करायची पद्धत ते अगदी आयुष्याकडे पहायचा दृष्टिकोन ह्या सगळ्याच गोष्टीत आजची तिशीतली पिढी आणि ५०शी ओलांडलेली पिढी ह्यात फरक आहे.
दुधाच्या रांगेत उभं राहिल्याशिवाय दूध नाही मिळत ते स्वीगी वरून हवा तो खाद्यपदार्थ घरपोच केवळ 30 ते 40 मिनिटात मोबाईलनी मागवण हा बदल छोटा नाहीये आणि भारतीय माणूस आज ना धड पारंपरिक पद्धतींना धरून आहे ना पूर्ण उपभोगवादी पाश्चिमात्य झालाय ह्यात तो फक्त अधला-मधला झालाय आणि हा माझ्या मते मूळ प्रॉब्लेम आहे!
आम्हाला माणसाचा आयुष्याकडे पहायचा दृष्टिकोन बदलून जगणं सोप करायचंय.भारताला जागतीक स्पर्धेत स्पर्धात्मक बनवायचय आणि त्यासाठी संवेदन जे जे करायला लागेल, ते ते करेल पण इथूनपुढे भारतीय माणसांनी स्वतःला कमी लेखण मात्र सहन करणार नाही.
आपल्याकडे आज काय नाहीए हो? मग आपण उगाचच का पाश्चिमात्यां पेक्षा स्वतः ला कमी समजतो ? आपल्या भाषेला स्वतःच कमी किंमत देतो, आपल्या मातृभाषेत साधा पत्ता ही विचारला तरी कळेल का ही आपल्याला शंका वाटते..
तुम्हाला वाटत नाही का की हे चित्र बदलायला हवं ?
तुम्हाला वाटत नाही का मी आज कोणावरही अवलंबून नसावं?
तुम्हाला वाटत नाही का मी जितके वर्ष जिवंत आहे, मी स्त्री असीन किंवा पुरुष माझं वय काहीही असो, मी एक जिवंत माणूस म्हणून जगतोय तर सन्मानानं आणि स्वावलंम्बत्व जपत जगावं ?
मी काहीना काही करून ह्या समाजाला आणि देशाला पुढे नेण्यात माझा ही काहीना काही वाटा रहावा?
की मरण येत नाही म्हणून आपला जगतोय असं जगणं जगत राहावं?
वाटत नाही का माझ्या मनातले विचार जगाला ऐकवावे?
वाटत नाही का जगभरातले लोक माझे मित्र असावे?
माझ्या सर्व आजी आजोबा आणि ज्या ज्या व्यक्तीला वाटतं की मोबाईल ह्या गोष्टीत अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मला शिकता आल्या तर माझं जगणं अधिक समृद्ध होईल…
अहो शिकायला काहीही वय नसतं चला ग्लोबल होऊया आपल्याच मोबाईल ला आपलं मित्र बनवूया हा मित्र तुम्हाला नव्या जगाची वाट दाखवेल, हा मित्र तुम्हाला मुला, नातवाच्या मागे टॅक्सी बुक करून देतोस का? म्हणत मागे लागू देणार नाही.
हा मित्र घरच्या घरी तुम्हाला इलेक्ट्रिक बिल भरून देईल, हा मित्र हवा तो मनोरंजनाचा कार्यक्रम , गाणं किंवा चित्रपट देखील हव्या त्या वेळेला दाखवून तुमचं मनोरंजन करेल.
मग वाट कसली पाहताय ही वेळ आहे विचार बदलायची आणि जग कवेत घेत जगण्याची!
तुमच्या सोबत असणार आहेत अगदी तुमच्या नातवाच्या वयाची मुलं आणि मुली ज्यांना तुम्ही कितीही वेळा हव्या त्या शंका बिधास्त विचारून शिकणार आहात..
इतकंच नाही सचित्र नोट्स ही सोबत असणारच आहेत. ही चळवळ आहे, अगदी जेष्ठ नागरिकांनाही मुक्त मोकळ्या वातावरणात शिकण्याची आणि भारताला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि डिजिटल करण्याची.

आपला नम्र
समीर मीलन दिघे
Sanvedan.com
Facebook.com/sanvedan
अधिक माहिती साठी संपर्क +917715901298

1 Comment

  1. Nandkumar w.Prabhu

    This is very nice information for Sr. Citizens.I will contact you soon regarding this matter. Thanks

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

अनिश्चितता आणि शेअर बाजारात गुंतवणूक!

सध्या शेअर बाजारातील वातावरण पाहून बरेच गुंतवणूकदार हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. अनेक जण काय करूया म्हणून सल्ला विचारायला येत आहेत, 23 तारखे नंतर गुंतवणूक करू म्हणून अनेक जण वाट पाहत आहेत आणि सध्याचा पडझडीला घाबरलेले ही अनेक आहेत. ह्या सर्वाचा गुंतवणूक प्रवास जरा...

शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe

शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe

शेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत. ज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न...

इन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड ! by Sameer Dighe

२५० हुन अधिक कार्यक्रम गुंतवणूक साक्षरते बाबत घेतल्यामुळे अनेक वेग वेगळी माणसं आणित्यांचा वेग वेगळ्या शंका ऐकाव्या लागतात, त्यात काहीही गरज नसताना इन्शुरन्स विकत घेतलेले महाभाग, तर कधी अगदी काही जाणांना लोन घेऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करायचा फुकटचा सल्ला बँक कर्मचारी...